शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी समाज घडविण्याचे कार्य करावे : सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:33 IST

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताना समाज घडविण्याचे उत्तम कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देशिक्षक पुरस्काराचे वितरण : १६ शिक्षकांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताना समाज घडविण्याचे उत्तम कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हा परिषदेच्या मा.सा.कन्नमवार सभागृहात मंगळवारी आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राम गारकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर आदी मान्यवर उपस्थित होते.शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरु असतो. तसाच समाजामध्ये परिवर्तन घडविण्याचेही शिक्षक मोलाचे कार्य करीत असल्याने पूर्वी शिक्षकाकडे समाज सुधारक म्हणूनच बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन होता. त्याच भावनेतून आताही शिक्षकांनी कार्य केल्यास देशाला आकार देण्यात मोठे योगदान शिक्षकांचे राहील, असे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात आदर्श निर्माण होईल अशा पध्दतीने चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या मूलभूत व भौतिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या सहा हजार शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यामुळे पुढील वर्षी सर्व सहा हजार शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी पात्र ठरतील, असे त्यांनी सांगितले.यावेळी शंकर आत्राम, बाबुराव डोंगरवार, ज्योती लहामगे, अनंता भोयर, सीमा भसारकर, आकाश झाडे, मंजुषा साखरकर, रविंद्र उरकुडे, मधुकर वाटेकर, विलास सावसाकडे, हिशोद तुरे, बंडू डाखरे, बाबा कोडापे, कविराज मानकर व भाऊराव तुमडे या जिल्हा परिषदेच्या १५ प्राथमिक शिक्षकांचा तर माध्यमिक शिक्षिका संगीता घोडेस्वार यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तर जिल्हा परिषदेच्या २४ शाळांना आयएसओ नामांकन मिळाला असून त्यापैकी तीन शाळेतील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.