शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षक उतरले आखाड्यात

By admin | Updated: May 16, 2016 01:05 IST

निकाल लागायला अद्याप बराच अवकाश आहे. पण विद्यार्थी मिळविण्यासाठी येथील शिक्षक आतापासूनच आखाड्यात उतरले आहेत.

नागभीड : निकाल लागायला अद्याप बराच अवकाश आहे. पण विद्यार्थी मिळविण्यासाठी येथील शिक्षक आतापासूनच आखाड्यात उतरले आहेत. विद्यार्थी व त्यांच्या पालकांना या शिक्षकांकडून विविध प्रलोभने देण्यात येत असल्याचा आरोपही यासंदर्भात होत आहे.विद्यार्थ्यांच्या तुलनेत शाळांचीच संख्या अधिक असल्याचा अनुभव पदोपदी येत आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही हीच परिस्थिती आहे. दोन हजार लोकसंख्येच्या गावात दोन दोन माध्यमिक शाळा असल्याची उदाहरणे याच तालुक्यात आहेत. पुन्हा तीन-चार किलोमीटरवर आणखी एक माध्यमिक विद्यालय असल्याचे चित्रही याच तालुक्यात आहेत. परिणामी आपल्या शाळेची पटसंख्या कायम राहावी. यासाठी शिक्षकांनाच धडपड करावी लागत आहे, नव्हे गेल्या चार -पाच वर्षात ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांच्यासमोर संस्थाचालकांनी हीच अट ठेवली होती असेही बोलले जात आहे.नागभीड शहराचा विचार करता नागभीड येथे तीन उच्च माध्यमिक आणि एक खासगी प्राथमिक विद्यालय आहे. आता हे प्राथमिक विद्यालयसुद्धा यावर्षी आठवा वर्ग सुरू करीत आहे, अशी माहिती आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकात स्पर्धा निर्माण झाली आहे. शिक्षकांसमोरची खरी अडचण पाचवीचे आणि आठवीचे विद्यार्थी मिळविणे ही आहे. एकदा विद्यार्थ्याने पाचवीत प्रवेश घेतला की दहावीपर्यंत कसलीच अडचण नाही आणि म्हणूनच हे विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांमध्ये चांगलीच चढाओढ असल्याचे दिसून येत आहे. यासाठी आमचीच शाळा कशी श्रेष्ठ आहे. आमच्या शाळेचा दर्जा कसा उत्तम आहे. हे तर वरकरणी पटवून देण्यात येत आहेच पण अंधारात वेगवेगळ्या सोयी सुविधांची आमिषे देण्यात येत आहेत, अशी वेगळी चर्चासुद्धा ऐकावयास मिळत आहे.गमतीची गोष्ट अशी की, एका विद्यार्थ्याकडे दोन-दोन, तीन-तीन शाळेचे शिक्षक जात असल्याने विद्यार्थ्यांचे पालकही भांबावून गेले आहेत. मुलाला कोणत्या गुरुजीच्या शाळेत टाकू, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. हे दृश्य केवळ नागभीडमध्येच आहे, अशातला भाग नाही. ज्या ठिकाणी दोन व त्यापेक्षा अधिक शाळा आहेत, त्या प्रत्येक ठिकाणीच ही परिस्थिती आहे. त्यातल्यात्यात झपाट्याने फोफावत असलेल्या ‘कॉन्व्हेंट’ संस्कृतीचा थोड्याफार माध्यमिक विद्यालयांवर परिणाम जाणवू लागला असला तरी या संस्कृतीने प्राथमिक शाळांचीसुद्धा हालत खस्ता होत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)