शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीच्या खांबावर मनपा लावणार कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:32 IST

अमृत पाणी पुरवठा योजनेत २५ टक्के वाटा तसेच राज्य सरकारकडून सहाय्यक अनुदान बंद झाल्याने मनपाची आर्थिक घडी विस्कटण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देउत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर : पुढील आमसभेत मंजुरीसाठी येणार विषय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अमृत पाणी पुरवठा योजनेत २५ टक्के वाटा तसेच राज्य सरकारकडून सहाय्यक अनुदान बंद झाल्याने मनपाची आर्थिक घडी विस्कटण्याची चिन्हे आहेत. त्याचा थेट परिणाम विकासकामांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आपल्या उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोत शोधणे सुरु केले आहे. वीज वितरण कंपनीचे शहरातील खांब आणि डिपीवर कर आकारणी केली जाणार असून, यातून दरवर्षी किमान २५ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.महाराष्टÑ राज्य वीज वितरण कंपनीकडून नेहमीच बिलासाठी सक्ती केली जाते. यातून महानगरपालिकासुद्धा सुटलेली आहे. यापूर्वी वीजबिल भरण्यासाठी थोडा उशिर झाल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी शहराच्या पाणी पुरवठ्याची वीज खंडीत केली होती. त्यामुळे मनपा प्रशासन आणि पाणी पुरवठा वितरण कंपनीला नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. वर्षानुवर्षापासून मोफत मिळालेल्या जागेवर वीज वितरण कंपनीचे खांब उभे आहे. महानगरपालिका शहरातील सर्वच बाबींवर कर आकारणी करते. मात्र, यातून वीज वितरण कंपनीचे खांब सुटले होते. त्यामुळे विजेच्या खांबावर कर आकारणी करण्यासाठी मनपाने माहिती गोळा करण्याचे काम सुरु केले. अगदी खोलवर जावून माहिती घेतली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या. नगरपालिका अस्तित्वात असताना सन २००२-०३ मध्ये नगर रचना विभागाने मालमत्ता कराची आकारणी केली होती. त्यावेळी प्रति महिना प्रति खांब पाच रुपये आणि डिपीवर २० रुपये कर आकारणी करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली होती. तत्कालीन नगररचनाकारांनी भाडे निश्चित करुन मुख्याधिकाºयांना कळविले होेते. मात्र मनपा प्रशासनाने जवळपास चार वर्षे कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यानंतर सन २००७ मध्ये नगरपरिषदेच्या आमसभेत ठराव क्रमांक ५४ अन्वये विद्युत खांबावर कर आकारणी करण्याला मंजुरी देण्यात आली होती. मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. जवळपास १० वर्षे निघून गेली. पण वीज वितरण कंपनीकडून कर घेतला जात नव्हता.महानगरपालिका आयुक्त संजय काकडे आणि उपायुक्त विजय देवळीकर यांनी मनपाच्या उत्पन्न वाढीचे स्त्रोत शोधताना वीज वितरण कंपनीच्या खांबावर कटाक्ष टाकला. दोन महिन्यांपूर्वी शहरातील विजेचे खांब आणि डिपीचा सर्व्हे करण्यात आला. त्यात सुमारे १५ हजार खांब आणि २०० डिपी असल्याचे दिसून आले. शहरात विजेचे खांब आणि डिपी किती आहे, याबाबत माहिती पुरविण्यात यावी म्हणून मनपा प्रशासनाने वीज वितरण कंपनीकडे पत्रव्यवहार केला. मात्र, दोन महिन्यांपासून मनपाच्या पत्राला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे महानगरपालिकेने आता पुढील कार्यवाही सुरु केली आहे. दोन वर्षापूर्वी शहरातील मालमत्तांचे नव्याने मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकपनाच्या तारखेपासून वीज वितरण कंपनीच्या खांबांवर कर लावण्याची भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे. प्रति महिना, प्रति खांब १० रुपये आणि डिपी २० रुपये कर आकारणी केली जाणार आहे. डिपीच्या ठिकाणी चार ते सहा खांब असतात. त्यामुळे महानगरपालिकेला दरवर्षी जवळपास २५ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहेत. तसेच २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षाचा अतिरिक्त ५० लाख रुपये कर मिळणार आहे. महानगरपालिकेच्या पुढील महिन्यातील आमसभेत हा विषय प्राधान्याने ठेवला जाणार असून, आमसभेची मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही सुरु केली जाणार आहे. वीज वितरण कंपनीकडून कर वसूल करणारी ही पहिलीच महानरपालिका ठरणार आहे.