शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पथकाकडून ३९ लाखांची करवसुली

By admin | Updated: March 17, 2017 00:54 IST

येथील नगर पंचायतीतर्फे सन २०१५-१६ या वर्षाची थकबाकी मालमत्ता कर व व्यावसायीक गाळे

सिंदेवाही नगरपंचायत : कर भरण्याचे आवाहन सिंदेवाही : येथील नगर पंचायतीतर्फे सन २०१५-१६ या वर्षाची थकबाकी मालमत्ता कर व व्यावसायीक गाळे किराया वसुली करण्यासाठी विशेष पथक गठित करण्यात आले होते. या पथकाने ३९ लाख ५९ हजार रुपयाची कर वसुली केली आहे. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी विलास कागदेलवार व अधीक्षक भास्कर निकुरे यांच्या नेतृत्वात विशेष कर वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. स्थानिक नगर पंचायत अंतर्गत मालमत्ता कर, गाळे किराया व पाणीपट्टी कराची थकबाकी लाखो रुपये होती. त्यामुळे नगरातील विकास कामांना निधी उपलब्ध होत नव्हता. सर्वप्रथम कर वसुली संदर्भात थकबाकीदारांना वसुलीसाठी लेखी सुचना देण्यात आल्या. तरीही कराची वसुली होत नव्हती. त्यामुळे नगर पंचायतने विशेष कर वसुली व जप्ती मोहिम राबविली. या मोहिमेअंतर्गत ९ व्यावसायीक दुकानांना सील लावून जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे सिंदेवाही नगरातील मालमत्ता, गृहकर २० लाख ३८ हजार रुपये, दिवाबत्ती कर १ लाख ६१ हजार, आरोग्य कर १ लाख ५७ हजार, सामान्य पाणीपट्टी कर ३ लाख ४१ हजार, गाळे भाडे १ लाख ६६ हजार, विशेष पाणी पट्टीकर १० लाख ९३ हजार मिळून एकुण ३९ लाख ५९ हजार रुपयाची कर वसुली करण्यात आली. विशेष मोहिमेद्वारे जप्तीची कार्यवाही सुरू केल्यामुळे थकबाकी असलेले मालमत्ता व व्यावसायीक दुकानदारांनी रोख तथा धनादेशाच्या स्वरुपात पथकाच्या दंडासहीत मालमत्ता कराचा भरणा केला. ३० मार्च २०१७ पर्यंत नागरिकांनी थकीत मागील व यावर्षीच्या कराचा भरणा नगर पंचायत कार्यालयात जमा करावे अन्यथा थकीत रक्कमेसह वृत्तपत्रात व नगरामध्ये ध्वनीक्षेपकाद्वारे तसेच चौका-चौका बोर्ड लावून थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे. (पालक प्रतिनिधी)