शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

यंदा चाखता येणार नाही चंद्रपूरच्या डोंगरगावच्या आंब्याची लज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:38 IST

नागभीड शेजारी असलेले डोंगरगाव आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंब्यांची नागभीडकरांना उन्हाळ्यात भुरळ पडते, मात्र यावर्षी येथील आंब्यांच्या झाडांना फळधारणाच झाली नसल्याने नागभीडकरांना डोंगरगावच्या आंब्यांच्या लज्जतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्दे१५० शेतकऱ्यांकडे आंब्याची झाडे यावर्षी आंब्याच्या झाडांना फळधारणाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हावर मात करण्यासाठी नागरिक विविध साधनांचा वापर करतात. शरीराला गारवा देणाऱ्या साधनांत आंब्याचाही समावेश आहे. नागभीड शेजारी असलेले डोंगरगाव आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंब्यांची नागभीडकरांना उन्हाळ्यात भुरळ पडते, मात्र यावर्षी येथील आंब्यांच्या झाडांना फळधारणाच झाली नसल्याने नागभीडकरांना डोंगरगावच्या आंब्यांच्या लज्जतीपासून वंचित राहावे लागणार आहे.आंब्याच्या कैऱ्या असो की, परिपक्व झालेले आंबे, पिकलेले आंबे, प्रत्येकालाच ते हवेहवेसे वाटतात. आंबे जरी हवेहवेसे वाटत असले तरी, झाड लावण्याची सवड कोणाजवळच नाही. त्यामुळे ग्रामीण भागात हा रानमेवा हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र डोंगरगावच्या काही शेतकऱ्यांनी या आंब्याला व्यावहारिक रूप देऊन या झाडांचे संगोपन केले. आंब्याचे गांव अशी डोगरगावची आता ओळख निर्माण झाली आहे.डोंगरगांव येथील उमेश दिनकर पाथोडे, शिवदास रामदास पाथोडे, अशोक लहानू पाथोड, अजय हिरामन कोसे यांनी आपल्या शेतात रत्ना, दशेरी, लंगडा, केशर या प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांकडे १५० च्या आसपास आंब्याची झाडे आहेत. या शेतकºयांनी उत्पादित केलेले आंबे एवढे दर्जेदार असतात की , डोंगरगावचे आंबे बाजारात केव्हा येतात, याची उत्सुकता येथील नागरिकांना असते.आंब्याचे गाव म्हणून ओळख

उन्हाळ्यातील काहिलीला काबूत ठेवण्यासाठी रामबाण उपाय म्हणून आंब्याकडे पाहिले जाते. डोंगरगाव हे गाव नागभीडपासून पाच किमी अंतरावर आहे. गावाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर आहे. धान पिकासोबतच भाजीपाल्याच्या उत्पादनासाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षात डोंगरगाव दर्जेदार आंब्यांमुळे चर्चेत आले आहे. एवढेच नाही तर हे गाव आंब्याचे गाव म्हणून ओळखले जाते.

ग्राहक गावात जाऊन करतात खरेदीआंबा पाडाला आला की, या आंबा उत्पादकांचे जे नेहमीचे ग्राहक आहेत ते ग्राहक फोनवरूनच आपल्याला किती आणि केव्हा आंबे लागतील याची सुचना देतात. त्याचबरोबर उर्वरित आंबे या उत्पादकांनी नुसते रस्त्याने फिरविले तरी हातोहात विक्री होतात.बाजारातील रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकविलेल्या आंब्यांपेक्षा डोंगरगावचे आंबे केव्हाही बरे, अशा आंबाशौकिनांच्या प्रतिक्रिया आहे. अनेकजण तर डोंगरगावला जाऊन आंबे खरेदी करतात.

टॅग्स :Mangoआंबा