शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाºयांसाठी लक्षवेध दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:06 IST

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे राज्य शासनातील महिला अधिकारी कर्मचाºयांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मागण्यांचे निवेदन प्रातिनिधिकरीत्या लक्षवेध दिन म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देराजपत्रित अधिकारी महासंघ : शासनाला ११ प्रस्तावांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे राज्य शासनातील महिला अधिकारी कर्मचाºयांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मागण्यांचे निवेदन प्रातिनिधिकरीत्या लक्षवेध दिन म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांना देण्यात आले. महाराष्ट्रात एकाचवेळी ८ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्ह्यात लक्षवेध दिन पाळण्यात आला.राज्य शासनातील महिला अधिकाºयांचे प्रश्न हाताळण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची दुर्गा महिला मंच शाखा कार्यरत आहे. या शाखेमार्फत प्रशासनातील महिला अधिकाºयांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जाते. सप्टेंबर महिन्यामध्ये या संदर्भात जिल्ह्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये ११ प्रस्ताव संमत करण्यात आले होते. या ११ प्रस्तावाचे निवेदन मुंबई येथे महासंघामार्फत ८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. तत्पूर्वी चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.यामध्ये बालसंगोपन रजा मंजुरी, वार्षिक वैद्यकीय तपासणी, ग्रॅज्युईटी गणना महागाई भत्ता धरुन करण्याबाबत, प्रसूती रजेला जोडून बालसंगोपनासाठी असाधारण रजा अर्हताकारी सेवा म्हणून मान्य करण्याबाबत, ताण व्यवस्थापनाबाबत शिबिरांचे शासनस्तरावरुन आयोजन करणे, चांगल्या दर्जाची महिला प्रसाधनगृहे उपलब्ध करावे, महिला प्रसाधन गृहामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, व्हेन्डींग व डिस्पोजल मशिन बसविण्यात यावी, पाळणा घराची सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाने, रुग्णालयात, सुरक्षा रक्षक नियुक्त करावे, महिलांना लैगिंक छळ प्रतिबंधक कायद्याचे प्रशिक्षण द्यावे, महिलांसाठी विशेष ट्रेन सुरु करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.या संदर्भात जागतिक महिला दिनापूर्वी ८ मार्च २०१८ पर्यंत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देण्यासाठी संघटनेचे राज्य मार्गदर्शक अरुण तिखे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, सरचिटणीस अविनाश सोमनाथे, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ, डॉ. सुचिता धांडे, डॉ.कांचन जगताप यांच्यासह अन्य महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.