शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नळ योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:38 IST

मागील दहा वर्षांपासून कोठारीवासीय पाण्यासाठी पायपीट करीत आहेत. वाढती गरज लक्षात घेवून नवीन नळ योजना सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़

ठळक मुद्देकोठारी पाणी टंचाई : दुरूस्तीची मागणी

आॅनलाईन लोकमतकोठारी: मागील दहा वर्षांपासून कोठारीवासीय पाण्यासाठी पायपीट करीत आहेत. वाढती गरज लक्षात घेवून नवीन नळ योजना सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़१९८४ मध्ये अस्तित्वात आलेली नळ योजना वीज वितरण कंपनीचे थकीत बिल आणि विहिरीतील तांत्रिक बिघाळामुळे २००७-८ पासून ठप्प आहे. ही नळयोजना सुरु करण्यासाठी ग्रा. पं. कडे गावकऱ्यांनी अनेकदा निवेदन दिले़ पण, दुर्लक्ष करण्यात आले़ ग्रा.पं.च्या नाकर्तेपणामुळे गावात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे़. गावातील ६० हातपंपावर गावकरी तहाण भागवीत आहेत.खनिज विकास निधीअंतर्गत तीन कोटीपन्नास लाखाची वर्धा नदीवर जलशुद्धीकरणासह योजना मंजूर केली. नळ योजनेचे बांधकाम पूर्ण होऊनही सप्टेंबर २०१७ मध्ये उद्घाटन केले. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटला उन्हाळ्याची सुरुवात झाली. तरीही गावकºयांच्या दारात पाणी पोहचले नाही. नवीन नळ योजनेसाठी वीज पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र ग्रा.पं.कडे जुनी थकबाकी भरल्याशिवाय सुरु करण्यास महावितरण कंपनीने नकार दर्शविला. दरम्यान, सप्टेंबर २०१७ मध्ये उद्घाटनासाठी वीज पुरवठा करण्यात आला़ १ मार्च २०१८ ला ग्रा.पं. पाच लक्ष ६९ हजार ३५० रुपये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून रक्कम भरण्यात आले़ तरीही वीज पुरवठा सुरु करण्यात आला नाही.नळ योजनेच्या प्रस्तावात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम नव्हते. जुन्या पाईप लाईनला दुरुस्त करुन नळ योजना कार्यान्वीत करायची होती. परंतु, जुनी पाईपलाईन नादुरुस्ती असल्याने नवीन पाईप लाईन टाकण्याचा तगादा ग्रा.पं. सरपंच मोरेश्वर लोहे यांनी धरला, असा आरोप गावकरी करीत आहेत़ जीवन प्राधिकरण विभागाने पाईप लाईनचा प्रस्ताव बनविला. मात्र त्यास मंजुरी न मिळाल्याने काम होवू शकले नाही. पूर्वी वीज वितरण कंपनीच्या थकीत देयकापोटी तर आता नवीन पाईपलाईन टाकण्याचा वाट उफाळून आला. या वादात कोठारीकरांचा जीव टांगणीला लागला असून पाण्यासाठी गावकरी त्रस्त झाले आहेत. वादात अडकलेली नळ योजना कोठारीकरांना जीवनदायीनी ठरण्यापेक्षा जीव घेणारी ठरली आहे. पाण्याची टाकी, जलशुद्धीकरण केंद्र शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत.