शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्ती अध्यक्षासाठी पुरस्कारप्राप्त गावातच तंटे

By admin | Updated: August 21, 2015 01:39 IST

नांदा ग्रामपंचायतीची आमसभा नागरिकांच्या आपसी मतभेदातच पार पडली. यात तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडीसाठी चांगलेच वादंग माजले असून तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी पूर्ण मतदान घ्यावे,....

नांदाफाटा: नांदा ग्रामपंचायतीची आमसभा नागरिकांच्या आपसी मतभेदातच पार पडली. यात तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडीसाठी चांगलेच वादंग माजले असून तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी पूर्ण मतदान घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी कोरपना तथा मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे. आमसभेत अध्यक्ष पदासाठी भास्कर लोहबडे आणि वसंत बोढाले यांचे नामांकन आले. यात लोहबडे यांची अध्यक्षपदासाठी वर्णी लागली. मात्र येथील ग्रामविस्तार अधिकारी सुरेश वाढई यांनी मतदारांची योग्य मोजणी न करताच लोहबडे यांना अध्यक्षपदासाठी घोषित केल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर तंटामुक्त समितीच्या सदर सदस्यांची नेमणूक न करताच अध्यक्षपद घोषित केले आहे. यामध्ये निवडणूकीपूर्वी पूर्वनियोजीत बेत आखून नेमणूक करण्यात आल्याचा आरोप ग्रामविस्तार अधिकाऱ्यांवर केला जात आहे. लोहबडे यांच्या बाजूला कमी आवाजी मतदान असताना बोढाले यांच्याकडील अर्धवट मोजणी करुन अध्यक्षपद घोषित केल्याचे समजते.या घटनेमुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असून प्रकरण पोलिसात गेले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून स्वस्त धान्य दुकान, विजेचे खांब, अंगणवाडी बांधकाम, साहित्य खरेदी रोपवाटिका आदी कारणांवरुन ग्रामपंचायतीत वादंग निर्माण झाले आहे. अशातच आता तंटामुक्ती अध्यक्षपदाचा वाद चव्हाट्यावर आला असून येथील आरटीई कार्यकर्ते अभय मुनोत, हारुण सिद्दीकी, उपसरपंच बंडू वरारकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंत बोढाले आदींनी अध्यक्षाच्या निवडीसाठी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे मतदान घेण्याची मागणी केली आहे. पुढे काय होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.