शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बिबी ग्रामपंचायतीला तालुका ‘स्मार्ट व्हिलेज’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:20 IST

तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने द्वितीय क्रमांकावर असलेली बिबी ग्रामपंचायत तालुक्यात विकासकामांमुळे मॉडेल व्हिलेज बनली असून नुकताच २०१७-१८ या वर्षाचा तालुका स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त झाला.

ठळक मुद्देविकासाकडे वाटचाल : विविध उपक्रम राबविले; लोकसहभागातून केली अनेक कामे

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने द्वितीय क्रमांकावर असलेली बिबी ग्रामपंचायत तालुक्यात विकासकामांमुळे मॉडेल व्हिलेज बनली असून नुकताच २०१७-१८ या वर्षाचा तालुका स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त झाला.बिबी ग्रामपंचायतची विकासाकडे वाटचाल सुरु असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये विकास कामे करण्याचा उत्साह आहे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे बिबी गाव नावारूपास आले आहे. शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व पदाधिकाºयांनी ग्रामपंचायतीला भेटी देऊन पाहणी केली असता विकासाबाबत समाधान व्यक्त केले. नुकताच कोरपना येथील कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार जाहीर झाला असून सरपंच मंगलदास गेडाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रामविकास अधिकारी अरुण वाकूडकर यांचा सत्कार करण्यात आला.बिबी ग्रामपंचायतीमध्ये बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु.), गेडामगुडा अशी पाच गावे समाविष्ठ आहे. गेल्या १२ महिन्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट गावातील १५ आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत एमएस-सीआयटी प्रशिक्षण, १५ विद्यार्थ्यांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण व परवाना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसन (बु.), धामणगाव व नैतामगुडा या शाळांना ई-लर्निंगसाठी संगणक संच, गावातील मुख्य मार्गावर, स्मशानभूमी व क्रीडांगणावर वृक्षारोपण, मनरेगाच्या माध्यमातून ६० शोषखड्डे, १८० एल.ई.डी. बल्ब, अल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाउंडेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील लोकांना शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम तसेच विविध रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, बंद गटारे, मुख्य प्रवेशद्वाराचे सौंदर्यीकरण, कचराकुंडी, युवकांसाठी वाचनालय व व्यायामशाळेची निर्मिती, सौर ऊर्जा पाणी पंप, तालुकास्तरीय पशु प्रदर्शन, पशु चिकित्सा शिबिरे, ‘ग्राम की बात’ कार्यक्रमातून गावकºयांचे प्रबोधन, गावातील लोकांना विविध ग्रामसभाविषयक माहिती, शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी स्पीकरच्या माध्यमातून दिवंडी दिली जाते. गटग्रामपंचायतीमधील बिबी, धामणगाव, आसन (बु.), नैतामगुडा व गेडामगुडा या पाचही जिल्हा परिषद शाळांना एक वर्गखोली डीजिटल करण्यासाठी एल.ई.डी. टी.व्ही. व इतर साहित्य देण्यात आले. अशाप्रकारची अनेक महत्वपूर्ण कामे अल्पावधीत झाल्याने गावाचा विकासदर समाधानकारक आहे.पेसा निधी, चौदावा वित्त आयोग, सामान्य निधी या निधीच्या माध्यमातून नियमित कामे होत असली तरी शासनाकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक कामे करून घेतल्या जात आहे. अल्पसंख्याक, तांडावस्ती, ठक्करबाप्पा व दलितवस्ती निधीच्या माध्यमातून कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीचा पाठपुरावा सतत सुरू आहे.विशेष म्हणजे, ग्रामपंचायत वृक्षलागवडीला जास्त महत्त्व देत आहे. अल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाउंडेशन, अंबुजा सिमेंट फाउंडेशन व ग्रामपंचायतच्या वतीने ३ हजार वृक्ष लावण्यात आले.तीन शाळांना आय.एस.ओ. मानांकनगटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा गेडामगुडा, बिबी व आसन (बु.) या तीन शाळांना आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे. एकाच ग्रामपंचायतमधील या तिन्ही शाळा असल्याने ग्रामपंचायतच्या नावलौकिकात भर पडली आहे.शुद्ध व थंड पाणीअल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाउंडेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने पेसा निधीअंतर्गत गावातील लोकांसाठी शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम सुरु करण्यात आले असून अल्प रकमेमध्ये पुरवठा होत आहे. ५ रुपयात लोकांना २० लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होत आहे.