गडचांदूर : कोरपना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सोनुर्ली (वनसडी) येथील महात्मा गांधी विद्यालयात पार पडली.प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सभापती निळकंठ कोरांगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रवींद्र गोखरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प सदस्य अरुण निमजे, उपसभापती मनोहर नैताम, सहायक संवर्ग विकास अधिकारी धनंजय सााळवे आदी उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील विविध शाळांच्या विज्ञान प्रतिकृती सादर केल्या होत्या. विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक विभागात आदिवासी गटातून प्रथम क्रमांक जि.प. शाळा लखमापूरची विद्यार्थिनी वैष्णवी चौधरीने पटकविला. गैरआदिवासी गटातून प्रथम क्रमांक जि.प. शाळा अंतरगावची जागृती बावणे, द्वितीय जवाहरलाल नेहरू विद्यालय आवारपूरची निकिता लोडे, तृतीय जि.प. शाळा पिपरीचा रितेश पाचभाई यांच्या प्रतिकृतीला मिळाला.माध्यमिक गटात आदिवासी विभागातून प्रथम क्रमांक प्रियदर्शिनी विद्यालय नांदाफाटाची कृष्णा बसवंते हिच्या प्रतिकृतीला मिळाला. गैरआदिवासी गटातून प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यालय गडचांदूरचा अमित पांडे, द्वितीय रूपेश चापले (म. गांधी विद्यालय नांदगाव), तृतीय बादल ंदेकर (लाल बहादूर शास्त्री विद्यालय) यांनी पटकविला. शिक्षक कृतीमध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक व्ही.एम. बोधाने (जुनागुडा), द्वितीय आर.बी. जाधव (चनई), माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कुरेशी मॅडम (सोनुर्ली) यांनी पटकविला.लोकसंख्या शिक्षणमध्ये प्रा. पत्रकार (सोनुर्ली) यांना पुरस्कार मिळाला. प्रदर्शनाचा समारोप संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव धनंजय गोरे, जि.प. सदस्य उत्तम पेचे, संवर्ग विकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे, गटशिक्षणाधिकारी दिलीप खनके, प्रा. विजय आकनुरवार, शिक्षण विस्तार अधिकारी झाडे, विजय परचाके, सचिन मालवी, मुख्याध्यापक अशोक लोहे उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रभाकर कोल्हे, वानखेडे, गुंडावार यांनी केले. प्रास्ताविक दिलीप खनके यांनी केले. अहवाल वाचन मुख्याध्यापक अशोक लोहे यांनी केले. संचालन वामन टेकाम यांनी केले. आभार विजय परचाके यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. (वार्ताहर)
सोनुर्ली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
By admin | Updated: December 24, 2015 01:23 IST