शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार -सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: September 1, 2015 00:51 IST

मूल येथील रेल्वेच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत लवकरच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सोबत बैठक घेऊन अतिक्रमण नियमित करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे

मूल : मूल येथील रेल्वेच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत लवकरच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सोबत बैठक घेऊन अतिक्रमण नियमित करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रहिवाशांना दिले. या विषयीची बैठक शुक्रवारी मूल येथील विश्रामगृहावर घेण्यात आल्यावर त्यांनी अतिक्रमण धारकांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, नगराध्यक्ष रिना थेरकर, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, तहसीलदार राजेश सरवादे व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. अतिक्रमण तात्काळ काढावे अशा प्रकारच्या नोटीस रेल्वे प्रशासनाने रहिवाशांना पाठविल्या होत्या. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यावर ना. मुनगंटीवार यांनी अतिक्रमणधारकांशी चर्चा करून हा विषय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून अतिक्रमण नियमित करण्याची विनंती करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच कायमस्वरूपी घरे देण्याबाबत योजना करण्यावर विचार केला जाईल, असे ते म्हणाले.यानंतर ना. मुनगंटीवार यांनी मूल शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. बसस्थानक, मामा तलाव, मा. सा. कन्नामवार सभागृह, सीमेंट रस्ता, रेल्वे स्थानक, क्रीड़ा संकुल, रुग्णालय, नवीन प्रशासकीय भवन, स्मशानभूमी, बाजार समिती आदी ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. केली. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजनेत मंजूर करण्यात आलेल्या निधीचे धनादेश ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)