शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:23 IST

मागील दहा दिवसांपासून मोठ्या भक्ती भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. यावेळी ढोलताशे, डिजेच्या तालावर गणेशभक्तांची पावले अविरत थिरकत होती. चंद्रपूरसह आजुबाजुच्या गावांवरून आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग फुलून गेले होते.

ठळक मुद्दे८,८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन : रस्ते गणेशभक्तांनी फुलले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दहा दिवसांपासून मोठ्या भक्ती भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. यावेळी ढोलताशे, डिजेच्या तालावर गणेशभक्तांची पावले अविरत थिरकत होती. चंद्रपूरसह आजुबाजुच्या गावांवरून आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग फुलून गेले होते.चंद्रपुरातील लोकांनी विसर्जन काळात अधिकाधिक मूर्र्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाला साथ दिली. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. महानगरपालिकेतर्र्फे जटपुरा गेटवरून बाप्पांवर पुष्पवृष्टी करून सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींचे स्वागत करण्यात येत होते. शहरात ठिकठिकाणी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा शब्दात भाविकांचा गजर होत होता.गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी ४ वाजता गांधी चौकातून सुरु झाली. याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत होते. मंडळांनी पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, प्रदूषण नियंत्रण याबाबत आकर्षक देखाव्यादरे जनजागृती केली. दरम्यान, विसर्जन प्रसंगी २ ते ३ वेळा रुग्णवाहिका जात असताना रुग्णवाहिकेस जाण्यास वाट मोकळी करून देण्यात आली. कृत्रिम तलावात १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत सात हजार ७८५ मातीच्या मूर्ती व एक हजार ८० पीओपी अशा एकूण आठ हजार ८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.सफाई कामगार २४ तासगणेश विसर्जन रात्री उशिरा २.३० पर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते. यासाठी विभागातर्फे त्यांना तीन शिफ्टमध्ये काम वाटून देण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान स्वच्छता कर्मचारी शक्य तितक्या तत्परतेने मिरवणुकी पाठोपाठच झालेला कचरा गोळा करीत होते. शहर स्वच्छ राखण्याकरिता मनपातर्फे मिरवणूक मार्गांवर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी आणि नंतर अश्या दोन्ही वेळेस रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. शेवटची गणेश मूर्ती रात्री २ वाजता शिरविण्यात आली. मनपा स्वच्छता विभागाने अस्वच्छ झालेले रस्ते सकाळी ६ वाजेच्या आत स्वच्छ केले.