शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तेलीयाची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:37 IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन अंतर्गत येणाऱ्या महत्वपूर्ण अशा तेलीया जलाशयाच्या नयनरम्य जंगलाला आग लागून ४.५ किमी क्षेत्राची आगीत जळून राख झाली.

वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात : वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरजदुर्गापूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन अंतर्गत येणाऱ्या महत्वपूर्ण अशा तेलीया जलाशयाच्या नयनरम्य जंगलाला आग लागून ४.५ किमी क्षेत्राची आगीत जळून राख झाली. बुधवारी अकस्मात लागलेल्या या आगीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे. कोर झोनमध्ये आग लागल्याने वाघासह अन्य सरपटणाऱ्या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ६२५ चौ.किमीच्या संरक्षित क्षेत्रात कोर झोनचा दर्जा आहे. याच्या मध्यभागी तेलीयाचे जलाशय आहे. उन्हाळ्यात ताडोबातील बहुतेक नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडतात. ताडोबा जलाशयाव्यतिरिक्त केवळ तेलीया जलाशयात मुबलक पाण्याचा साठा असतो. मुबलक पाणी व हिरव्यागार असलेल्या या जलाशयाच्या आसपास वाघासह सारेच वन्यजीव आश्रयास असतात. अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महत्वाच्या ठिकाणी गुरुवारी (२७) अकस्मात भिषण आग लागली. तीव्र गतीने जोरदार वाऱ्याच्या दिशेने या आगीचा सर्वत्र भडका उडत होता. बॉम्बचा स्फोट होऊन भडका उडतो, त्याप्रमाणे या आगीचे रौद्ररुप होते. काही वेळातच या आगीने तेलीया जलाशयासभोवतालचे ४.५ किमीचे क्षेत्र कवेत घेतले. जैवविविधतेने संपन्न अशा वन्यजीवांच्या आश्रयस्थानाची काही वेळातच राखरांगोळी झाली. सध्या सूर्य आग ओकत आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात वन्यप्राणी तेलीया जलाशयाच्या आश्रयात राहतात. मात्र या परिसरालाच आग लागल्याने वाघासह अन्य वन्यजीव प्रभावित झाले आहे. तृणभक्षी वन्यजीवांचा चारा, पक्ष्यांची पिल्ले, अंडी, घरटे, सरपटणारे प्राणी किटक फूलपाखरे तसेच विविध वनस्पती बियाणे भस्मसात झाले. तेलीया जलाशयाच्या या ४.५ किमीच्या राऊंडमध्ये एरवी पर्यटकांना वाघासह सरपटणाऱ्या वन्यजीवांचे हमखास दर्शन होत होते. मात्र आता तेथे केवळ जळालेली वृक्ष व राखेचे दर्शन होत आहे. यामुळे पर्यटकांचाही भ्रमनिराश होत आहेत.मानवनिर्मित या आगीमुळे वनाचे वैभव असलेल्या वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. व्याघ्र संरक्षण व संवर्धन करण्याकरिता वनविभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात जंगलाला ठिकठिकाणी आगी लागतच आहेत. यातच ताडोबाच्या कोर झोनमध्ये आग लागणे, हे वन्यजीवांच्या अस्तित्वाकरिता एक धोक्याची घंटा आहे. याकरिता वनविभागाला ठोस पावले उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)