शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी गोवरीचे तलाठी कार्यालय कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी साजाअंतर्गत येणाऱ्या हिरापूर, निंबाळा, चिंचोली येथील शेतकऱ्यांना सातबारा काढण्यासाठी गोवरी येथील तलाठी कार्यालयात यावे लागते. शासनाने सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज आॅनलाईन केले आहे. शासनाचे हे एक प्रगतीचे पाऊल असले तरी गोवरी येथील तलाठी कार्यालयात वीज नसल्याने कार्यालयच बंद ठेवण्यात येत आहे.शेतकºयांना सद्या पीक कर्ज ...

ठळक मुद्देप्रभारी तलाठी : सातबारा दाखल्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी साजाअंतर्गत येणाऱ्या हिरापूर, निंबाळा, चिंचोली येथील शेतकऱ्यांना सातबारा काढण्यासाठी गोवरी येथील तलाठी कार्यालयात यावे लागते. शासनाने सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज आॅनलाईन केले आहे. शासनाचे हे एक प्रगतीचे पाऊल असले तरी गोवरी येथील तलाठी कार्यालयात वीज नसल्याने कार्यालयच बंद ठेवण्यात येत आहे.शेतकºयांना सद्या पीक कर्ज घेण्यासाठी सातबाराची आवश्यकता पडत आहे. त्यासाठी शेतकरी गोवरी येथील तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. गोवरी येथील तलाठी सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी तलाठ्याचे पद रिक्त आहे. येथील प्रभार सास्ती येथील तलाठी मारोती अन्ने यांच्याकडे आहे. सास्ती आणि गोवरी या दोन साजात १० गावांचा समावेश असल्याने एवढ्या शेतकऱ्यांना भार पेलताना तलाठ्याची मोठी कसरत होत आहे.परिणामी शेतकºयांना वेळेवर आॅनलाईन सातबारा मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आॅनलाईन सातबारासाठी राजुरा येथील तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपले काम बाजुला सारावे लागत असून यातून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.त्यामुळे गोवरी येथील तलाठी कार्यालयात वीज उपलब्ध करून द्यावी व स्वतंत्र तलाठ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व गोवरी वासीयांनी केली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून नागरिकांची समस्या सोडवण्याची मागणी आहे.आॅनलाईन सातबारासाठी तहसील कार्यालयात चकराशासनाने सर्वच शासकीय कार्यालयातील कामे आॅनलाईन केली आहेत. त्यासाठी कार्यालयात वीज आहे किंवा नाही याची शहानिशा करणे आवश्यक होते. मात्र गोवरी येथील तलाठी कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून वीज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारासाठी तहसील कार्यालय गाठावे लागत आहे.