शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या -किशोर जोरगेवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:19 IST

वेकोलिचे मुख्य प्रबंधक यांना किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे इरफान शेख, संतोष दिकोंडवार, इम्रान खान, विनोद अनंतवार यांच्यासह सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देसुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलिचे मुख्य प्रबंधक यांना किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे इरफान शेख, संतोष दिकोंडवार, इम्रान खान, विनोद अनंतवार यांच्यासह सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.वेकोलिच्या चंद्रपूर येथे २२५, बल्लारपूर १२५, सास्ती १५०, वणी २८० आणि प्रतीक्षा यादीमध्ये २५० सुरक्षा रक्षक आहेत. साधारणत: ३ महिन्यापासून या सुरक्षा रक्षकांना काम नाही. २ दिवसापूर्वी घुगुस येथील ५५ वर्षीय फ्रांसिस एंथोनी एंड्री या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केली तसेच कुटुंबाची जबाबदारी असलेल्या पुन्हा एका सुरक्षा रक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न किशोर जोरगेवार यांनी केला आहे.वणीचे मुख्य प्रबंधक मजुमदार यांना निवेदन देवून कित्येक वर्षांपासून वणी नार्थ, वणी, चंद्रपूर, सास्ती, बल्लारपूर, माजरी या एरिया मध्ये जवळपास १००० ते १२०० सुरक्षा रक्षक कार्यरत होते. वेकोलिने खाजगी कंत्राट रद्द केल्याने याचा मोठा फटका सुरक्षा रक्षक यांना फ टका बसला आहे. त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. सुरक्षा रक्षक यांची आर्थिक, मानसिक परिस्तिथी लक्षात घेता त्यांना काम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी किशोर जोरगेवार यांनी संपूर्ण सुरक्षा रक्षकांशी चर्चा केली तसेच मुख्य प्रबंधक मुजुमदार यांना निवेदन देवून चर्चा केली.तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या समस्यांवर सात दिवसात तोडगा काढून त्यांना कामावर रूजू करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य प्रबंधक यांनी उपस्थितांना दिले.मागण्यांची पुर्तता करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते.पण मुख्य प्रबंधक यांनी फोन करून आंदोलन थांबवा, अशी विनंती केली. मात्र मागण्या न सोडविल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.