शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मार्ग दिशादर्शक फलकावर दीक्षाभूमीची नोंद घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 01:00 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ आॅक्टोबर १९५६ ला तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ आॅक्टोबर १९५६ ला तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ही भूमी ‘दीक्षाभूमी’ या नावाने जगप्रसिद्ध पावली. चंद्रपूर शहरातील या ऐतिहासिक व पवित्र ‘दीक्षाभूमी’ वर देश विदेशातील बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायी दरवर्षी लखोच्या संख्येने श्रद्धाभावाने येतात. त्यामुळे दिशादर्शक फलकावर दिक्षाभूमीची नोंद घ्यावी, अशी मागणी आहे. महानगरपालिका नियम विधीद्वारे चंद्रपूर शहरातील अनेक ऐतिहासिक व महत्त्वाच्या स्थळांचे दिशा दर्शविणारे मार्ग दिशादर्शक फलके शहराच्या विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध पावलेली ऐतिहासिक ‘दीक्षाभूमी’ हे स्थळ नोंदविण्यात आले नाही. हे बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखविणारी बाब आहे. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूर व डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर व शहरातील बौद्ध बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ व २ यांना अ‍ॅड. राहुल घोटेकर सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. दीक्षाभूमीचे नाव मार्ग दिशादर्शक फलकावरून गडप कसे झाले, ही गंभीर बाब शासकीय पातळीवर विचार करणारी आहे. या प्रश्नाकडे चंद्रपूर शहरातील जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग १ व २ यांनी जातीने लक्ष देऊन दीक्षाभूमीचे नाव मार्ग दिशादर्शक फलकावर लावण्यासाठी खंभीर भूमिका घ्यावी, अशी मागणी संस्थेचे सहसचिव कुणाल घोटेकर व व्यवस्थापक धर्मपाल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, अनु दहेगावकर, कुणाल चहारे, स्वप्नील कांबळे, मुनेश्वर गजभिये, सिद्धार्थ पाथर्डे, डॉ. विजया गेडाम, प्रा. व्ही.एम. धडाडे, शिला दहिवले, प्रज्ञा रामटेके, अशोक कांबळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)