शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

आजारांवर उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:53 IST

जिल्ह्यामध्ये विविध इस्पितळात व सरकारी रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य किटकजन्य आजार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन आजारावर नियंत्रण मिळविणारी मोहीम तातडीने सुरू करण्याचे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : तत्काळ मोहीम राबविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये विविध इस्पितळात व सरकारी रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य किटकजन्य आजार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन आजारावर नियंत्रण मिळविणारी मोहीम तातडीने सुरू करण्याचे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.जिल्ह्यामध्ये किटकजन्य आजार वाढत आहेत. काही व्यक्तींना डेंग्यू सदृश्य आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय हिवताप लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अधिकाºयांनी ग्रामीण व शहरी भागांमध्ये उपाययोजना आखाव्यात, असेही ना. मुनगंटीवार सांगितले. विविध आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि विविध आरोग्य योजनांची माहिती ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करून अमलबजवणी करण्याचे निर्देशही ना.मुनगंटीवार यांनी दिले.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठकजिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेऊन किटकजन्य आजाराबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. पावसाळा संपण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये मलेरिया, डेंग्यू आणि स्क्रब टायपस या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णला औषधोपचार मिळाला पाहिजे, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साठे, जिल्हा हिवताप हत्तीरोग अधिकारी डॉ.अनिल कुकडपवार, मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आंबटकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, पालकमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय इंगोले व अन्य अधिकारी उपस्थित होते.