शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

बेजबाबदार ग्राम सचिवावर कारवाई करा

By admin | Updated: December 27, 2015 01:29 IST

तालुक्यातील चेकबरांज या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कारकिर्दीत सचिव पदावर असताना एम.एस. येवले यांनी गाव नमूना आठ तयार करताना नियमाला धाब्यावर बसविले.

मागणी : पिपरबोडीचे अपूर्ण रेकॉर्ड माहिती प्रकरणभद्रावती : तालुक्यातील चेकबरांज या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कारकिर्दीत सचिव पदावर असताना एम.एस. येवले यांनी गाव नमूना आठ तयार करताना नियमाला धाब्यावर बसविले. त्यामुळे गावातील अनेक भूधारक व मालमत्ताधारकांचे नुकसान झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आल्याने सचिवाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य शंकर अण्णा कोलनेडी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.चेकबरांज ग्रामपंचायतीमध्ये नवीन पिपरबोडी हा भाग आयुध निर्माणी वसाहतीला लागून आहे. गेल्या २५ वर्षांपासून या भागात अनेक कुटुंब घर बांधून वास्तव्याला आहेत. हा भाग बरांज येथील कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीसाठी संपादित करण्यात आला होता. या गावाची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला नसल्याने ही जागा शेतजमीन या नावाने नोंदविल्याने त्या ठिकाणच्या कुटुंबीयांना अत्यल्प मोबदला मिळाला. परंतु गावकऱ्यांनी या मोबदल्याच्या विरोधात आवाज उठविला. ग्रामपंचायत सदस्य शंकर अण्णा कोलनेडी यांनी या भागाचा संपूर्ण रेकॉर्ड माहितीच्या अधिकाराद्वारे मागविला असता धक्कादायक बाब सामोर आली. यात एम.एस. येवले हे १ आॅगस्ट १९९९ ते २८ सप्टेंबर २००० या काळात येथे कार्यरत होते. तसेच त्यानंतर े१९ आॅगस्ट २००७ ते सन २०११ व सन २०१३ ते २०१४ या काळात सुद्धा कार्यरत होते. त्यांनी नवीन पिपरबोर्डीचा रेकार्ड तयार करताना गाव नमुना ८ हा नियमाला धरुन बनविला नाही. प्रमाणित रेकॉर्डसाठी ग्रामसेवक सरपंच, विस्तार अधिकारी आणि संवर्ग विकास अधिकारी या चारही जणांचे सही, शिक्क्याने प्रमाणित केली पाहिजे. तरच तो रेकॉर्ड प्रमाणित मानल्या जातो. गाव नमुना ८ हा दर चार वर्षाने बनविला जातो. सन २००० ते २००१ या काळात कार्यरत ग्रामसेवक व्ही.आर. भिवगडे यांनी चारही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने रेकॉर्ड प्रमाणित केला होता. परंतु येवले यांनी सरपंच आणि सचिव या दोघांच्या सही शिक्क्याने रेकॉर्ड तयार केला. त्यामुळे गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)