मुलांच्या शालेय जीवनातील महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा म्हणजे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आहेत. कोरोनामुळे यावर्षी मुलांचे निम्मे शैक्षणिक वर्ष वाया गेले. आता कुठे अभ्यासाची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली आहे. त्यातच काल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली. त्यानुसार बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते २२ एप्रिल, लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मेपर्यंत तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा ९ ते २८ एप्रिल आणि लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मेपर्यंत घेण्यात येणार आहे. राज्यातील इतर भागात या दिवसाचे तापमान ४० अंशांच्या घरात राहते. मात्र विदर्भात यादरम्यान दररोजचे तापमान ४५ ते ४७ अंशांच्या घरात असते. त्यामुळे अंगाची अशा लाही लाही करणाऱ्या गरमीत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण जाणार आहे. त्यामुळे ८ ते ११ वाजता सकाळ पाळीत परीक्षा घ्यावी, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा सकाळ पाळीत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:29 IST