शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ नागपंचमी चिमूरकरांसाठी रक्तरंजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:10 IST

‘गुलामी अब नही हो ना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिए मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’

ठळक मुद्देचिमूरचा ७५ वर्षांपूर्वीचा रणसंग्राम : नागपंचमीच्या बाºयातूनच घडला उठाव

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ‘गुलामी अब नही हो ना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिए मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. इंग्रजांच्या गुलामीतून भारताला मुक्त करण्यासाठी युवकांनी १६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीच्या दिवशी इंग्रज झुलमी अधिकारी एसडीओ डुगांजी, नायब तहसीलदार सोनवाने व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ ची ‘ती’ नागपंचमी चिमूरकरांसाठी रक्तरंजित ठरली होती.इंग्रजांची जुलमी सत्ता भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजींनी ८ आॅगस्ट १९४२ ला मुंबई येथून ‘करा अथवा मरा’ असा संदेश दिला. या आदेशाने तरुणांना नवी स्फुर्ती दिली. या आदेशाने चिमूर येथील युवक क्रांतीकारांनी स्वातंत्र्यासाठी गुप्त बैठका व प्रभात फेºया काढण्याला १२ आॅगस्ट १९४२ ला सुरूवात केली. याच परिसरात वास्तव्यास असलेले राष्ट्रसंत गावागावात भजनाच्या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्याविषयी प्रेरीत करित होते.१५ आॅगस्ट १९४२ ला सकाळच्या सत्संगाच्या वेळी तुकडोजी महाराज यांनी ठाणेदार हरिराम शर्मा यांची भेट घेतली. नंतर गावात भव्य मिरवणूक काढून रात्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे देशभक्तीपर जोशपूर्ण भजन, ‘पत्थर सारे बाम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना’ याची महाराजांनी जनतेला जाणीव करून दिली. महाराजाच्या या क्रांतीकारी भजनाने चिमुरातील क्रांतीकारक पेटून उठले होते. त्यांच्या मनात इंग्रजाविषयी मोठा द्वेष उफळला होता.१६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीचा दिवस असल्याने घराघरात नागदेवतेची पूजा करीत बाºया बोलल्या जात होत्या. अशातच सकाळी ९ वाजता गोपालराव कोरेकर यांच्या नेतृत्वात अभुतपुर्व प्रभातफेरी काढली. या फेरीत काँग्रेस, सेवादल व संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रभातफेरी जुना बसस्थानक येथे आली. तिथे ‘व्हाइसराय दिल्ली मे, जुते खाओ गल्ली मे’ अशा घोषणा देत नागमंदिराकडे जात होती. नागपंचमीमुळे नागमंदिराजवळ शेकडो नागरिक जमा झाले होते. मात्र काही क्रांतीकारकांच्या मनात वेगळेच होते.राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत झालेल्या क्रांतीकारांपैकी सेवादलचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला व सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदानावर येवून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिले.तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यविराच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून घेतला व १२ क्रांतीकारकांना तुरुंगात डांबले. या घटनेने चिडून क्रांतीकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकारी डुगांजी, सोनवाने व जरासह यांच्याकडे वळविला व या तिन्ही अधिकाºयांना यमसदमी धाडले. याकरिता अनेक क्रांतीकारकांना लाठीमार खावा लागला. तर याच दिवशी १६ वर्षाचा बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार व बाबुलाल झिरे यांना १६ आॅगस्ट १९४२ नागपंचमीच्या दिवशी विरमरण येवून क्रांतीभूमीसाठी शहीद झाले. त्यामुळे १९४२ ची ‘ती’ नागपंचमी चिमूरकरासाठी रक्तरंजित ठरली होती.