शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

तलाठ्याच्या निलंबनासाठी तहसीलदार सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:55 IST

अ‍ॅट्रासिटी अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करू, असा धाक दाखवून शासकीय कामांकडे दुर्लक्ष करणारे तलाठी अविनाश दुर्योधन यांच्या निलंबनासाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सरसावली. यासंदर्भात संघटनेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : अ‍ॅट्रासिटी अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करू, असा धाक दाखवून शासकीय कामांकडे दुर्लक्ष करणारे तलाठी अविनाश दुर्योधन यांच्या निलंबनासाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सरसावली. यासंदर्भात संघटनेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.तलाठी अविनाश दुर्योधन यांनी शासकीय कामात हलगर्जी केल्याने तहसीलदार सचिन गोसावी यांनी वार्षिक वेतनवाढ रोखली. ही कार्यवाही शासकीय नियमानुसारच करण्यात आली, असा दावा तहसीलदार संघटनेने निवेदनात केला. दुर्योधन यांनी शासनाच्या सातबारा संगणीकृत कामाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी अपिल दाखल करायला हवे होते. मात्र कारवाई होऊ नये, यासाठी अ‍ॅट्रासिटी कायद्याचा दबावतंत्र म्हणून वापर करीत आहेत, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी सदर प्रकरण चौकशीत ठेवले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार यांनी सांगितले. याबाबत सरकारी अभियोक्ता यांचे मत मागितल्याचेही ते म्हणाले. दुर्योधन यांना तत्काळ निलंबित करावे, गोसावी यांच्याविरूद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात येवू नये, अशी मागणी केली. यावेळी सावलीचे तहसीलदार उषा चौधरी, रवींद्र होळी, समीर माने, विकास अहीर, पल्लवी टेमकर, सचिन गोसावी आदी उपस्थित होते.