शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागभिडात साकारताहेत स्विमिंग पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

धूर फवारणी करण्याची मागणी वरोरा : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. ...

धूर फवारणी करण्याची मागणी

वरोरा : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने मच्छरांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही मोकळ्या भूखंडांवर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे याचाही धोका नागरिकांना आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

रस्त्यावरील अंधार दूर करा

कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गावर पथदिवे नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर पोलीस ठाणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, क्रीडासंकुल, आदी आहेत.

गडचांदूर-जीवती मार्गावरील खड्डे बुजवा

जीवती : गडचांदूर-जीवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले. परिणामी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्रासदायक ठरलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी.

अवैध वाहतुकीला आळा घालावा

राजुरा : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. मागील आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसांतच ही मोहीम थंड झाली. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी आहे.

भद्रावती तालुक्यात रानडुकरांचा हैदोस

भद्रावती : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील काही गावांतील शिवारात जंगली प्राण्यांनी शेतात धुमाकूळ सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हाती आलेल्या पिकांचे प्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

डासांचा उच्छाद वाढला

मूल : तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधितांनी तत्काळ लक्ष देण्याची मागणी आहे.

कोरपना येथील दूरभाष केंद्र रामभरोसे

कोरपना : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथील दूरभाष केंद्र दुर्लक्षितपणामुळे दुरवस्थेकडे वाटचाल करत आहे. मात्र, याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आजघडीला टाॅवर, मायक्रो वेव्ह यंत्रणा, दूरभाष केंद्र व सदनिका परिसर संपूर्णतः झुडपाने वेढला गेला आहे. परिणामी, येथे माकड व इतर हिंस्र प्राणी यांचा वावर वाढला आहे. इमारतीवरही मधमाश्यांचे पोळे तयार झाले आहे. येथील कार्यालयही केवळ नाममात्र आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.