शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोड बोलण्यातून वाढेल एकमेकांप्रती आत्मियता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:04 IST

संत तुकारामांनी ‘आम्हा घरी शब्दांची रत्ने’ हा अभंग लिहून शब्दांचे सामर्थ्य दाखवून दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेचा कसा वापर होतो, यावर सुसंवादाची प्रक्रिया पुढे जाते. मुल जन्माला आल्यानंतर बोबड्या बोलापासून तर भाषिकस्तर उंचावण्यासाठी कुटुंब व सभोवतीचे सामाजिक पर्यावरण कसे असते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देप्रशासन अधिकारी (शिक्षण) नित यांचा सल्ला

संत तुकारामांनी ‘आम्हा घरी शब्दांची रत्ने’ हा अभंग लिहून शब्दांचे सामर्थ्य दाखवून दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेचा कसा वापर होतो, यावर सुसंवादाची प्रक्रिया पुढे जाते. मुल जन्माला आल्यानंतर बोबड्या बोलापासून तर भाषिकस्तर उंचावण्यासाठी कुटुंब व सभोवतीचे सामाजिक पर्यावरण कसे असते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोड अन् लाघवी बोलण्यातून माणसे जुळतात. नकारात्मक बोलण्याने दुरावतात, असे मत चंद्रपूर मनपाचे प्रशासन अधिकारी (शिक्षण) नागेश नित यांनी व्यक्त केले.गोड बोलण्यामुळे खरे यातून एकमेकांविषयी आदराची भावना निर्माण होते. तरीदेखील काही व्यक्ती याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने सतत विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतो. कुटुंबापेक्षा विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ शाळेतच जात जातो. अध्यापन व अध्ययनाची प्रक्रिया ही दुहेरी असते. यामध्ये संवाद हा घटक महत्त्वाचा ठरतो. विषय समजावून सांगताना शिक्षक रंजकतेचा वापर करत असतील तर ज्ञान विद्यार्थ्यांच्या मनात ठसते. ज्ञानग्रहनातील संकटे दूर होतात. मराठी संत साहित्यात अशी हजारो उदाहरणे आहेत. जगणे कितीही कष्टप्रद असो गोड बोलण्याने एका क्षणात दु:ख हलके होते.दैनंदिन आयुष्यात अनेकदा मतभेद निर्माण होतात. मात्र मनभेदांना थारा देऊ नये. बोलण्यातील माधुर्य टिकविण्याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. दोन पिढ्यांचा भाषिकस्तर आता बदलला असला तरी त्यातील गोडवा कदापि संपणार नाही, अशी शब्दसंपत्ती मराठी भाषेत आहे.