शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील सव्वालाख बालकांना गोवर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:08 IST

महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गोवर व रुबेला रोगांसंबंधी जागृती व लसीकरण मोहिमेला गुरूवारपासून सुरू करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सव्वालाख बालकांचे लसीकरण केले जाणार आहे.

ठळक मुद्देमनपाची मोहीम : प्रत्येक वॉर्डात शिबिरांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गोवर व रुबेला रोगांसंबंधी जागृती व लसीकरण मोहिमेला गुरूवारपासून सुरू करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सव्वालाख बालकांचे लसीकरण केले जाणार आहे.महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली व मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. रूबेला लसीकरण मोहीम देशभरात सुरू झाली आहे. २०२० पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला नियंत्रण करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. यात देशभरातील ४१ कोटी बालकांचे लसीकरण नोव्हेंबरमध्ये करण्याचे उद्दिष्ठ पुढे ठेवण्यात आले. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेत पहिल्या दोन आठवड्यांत शाळांमधील मुला व मुलींना लस देण्यात येणार आहे. शाळेत न जाणाºया मुलांचे लसीकरण तर शेवटच्या आठवड्यात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांकडे लक्ष केंद्रीत केले जाईल. ही लस गोवर व रूबेला या संसर्गजन्य रोगांवर प्रभावी व दीर्घकाळ रोगप्रतिकार शक्ती देणारी आहे. गोवर गोवरच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते, अशी माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी यावेळी दिली. शहरातील बालकांच्या आरोग्यासाठी विविध योजना तयार करून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे नियोजनही यावेळी करण्यात आले. मान्यवरांनीही मनपाच्या उपक्रमांवर चर्चा केली. याप्रसंगी गजानन बोकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, उपसंचालक कार्यालय एसएमओ डॉ. साजिद, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. मेश्राम, डॉ. नितीन कापसे, विविध स्वयंसेवी संस्था शाळांचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.मातांनी घ्यावी काळजीजगात दरवर्षी ५० हजार मृत्यू गोवर रोगामुळे होतात. त्यातील ४० टक्के भारतात होत आहेत. १९९५ पासून पोलिओ निर्मूलनाची मोहीम सुरु झाली. त्याचप्रमाणे गोवर व रुबेला निर्मूलनासाठी कार्य सुरु झाले आहे. चंद्रपूर शहरातील मातांनी आपले बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे यांनी दिली.लसीकरणाचे फ ायदेलसीकरणामुळे बालमृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे. भारत पोलिओमुक्त झाला आहे. याआधी गोवर लस देण्यात येत होती. परंतु आता गोवर व रुबेला दोन्ही रोगांकरिता एकच लस देण्यात येणार आहे. शासनाकडून आरोग्यासाठी भरपूर निधी देण्यात आला. लसीकरण हा त्याचाच एक भाग आहे. चंद्रपुरात शाळानिहाय केले जाणार आहे. त्यामुळे एकही बालक सुटता कामा नये याची काळजी घेण्यात येत आहे. पालकांमध्ये जागरूकता सुरू असून मातांना विशेष लक्ष दिले पाहिजे, असेही महापौर अंजली घोटेकर याप्रसंगी म्हणाल्या. कुटुंबातील एक बालक जर पीडित असेल तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. शहरात एकही बालक गोवर व रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी समाजातील सर्वांनी सहकार्य करावे, असेही महापौर घोटेकर यांनी मोहिमेच्या उद्घाटनाप्रसंगी नमुद केले.