शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊ वस्तूपासून केले टिकाऊ खत पेरणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:00 IST

माणसामध्ये कल्पकता असेल तर तो काहीतरी नवनिर्मिती करु शकतो अन् या कल्पकतेला जर मेहनतीची जोड असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लगेचच दिसून येतो. भद्रावती येथील प्रगत शेतकरी प्रा. विलास कोटगिरवार यांच्या रुपाने अनुभवयास येत आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूपासून तयार केलेले टिकाऊ खत पेरणी यंत्र सध्या नावारुपास येत आहे.

ठळक मुद्देइतर शेतकऱ्यांसाठी लाभदायक : विलास कोटगिरवार यांच्या कल्पनेतून साकारले यंत्र

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : माणसामध्ये कल्पकता असेल तर तो काहीतरी नवनिर्मिती करु शकतो अन् या कल्पकतेला जर मेहनतीची जोड असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लगेचच दिसून येतो. भद्रावती येथील प्रगत शेतकरी प्रा. विलास कोटगिरवार यांच्या रुपाने अनुभवयास येत आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूपासून तयार केलेले टिकाऊ खत पेरणी यंत्र सध्या नावारुपास येत आहे. या पेरणी यंत्राद्वारे त्यांनी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा दिला आहे.पावसाळ्यात वापसा (वाळाणी) लवकर येत नसल्याने औताद्वारे पिकाला रासायनिक खत देता येत नाही. वेळेवर मजूरसुद्धा उपलब्ध होत नाही. यासाठी प्रा.विलास कोटगिरवार यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे रासायनिक खत पेरणी यंत्र तयार केले आहे. त्यामुळे मजुरांकरवी रासायनिक खत देण्यापेक्षा या खत परेणी यंत्राद्वारे रासायनिक खत देता येते व नंतर डवऱ्याद्वारे रासायनिक खत जमिनीत गाडता येते. प्रा. विलास कोटगिरवार यांची भद्रावती ते तेलवासा रस्त्यालगत स्वत:ची शेती आहे. त्यांनी भंगारमध्ये टाकलेला हायटेक फवारणी पंप घेतला. त्याची फक्त टाळी तेवढी घेतली. बाकी सर्व जोडणी काढून टाकली. पंपाच्या टाकीला मागच्या बाजूने खाली छिद्र पाडून पाऊन इंची पिव्हीसी एमटीए बसविले. रासायनिक खत नियंत्रित करण्याकरिता त्याला एक व्हॉल्व बसविला. त्याखाली पाऊन इंची टी लावली. टिच्या बाजूला रिड्युसर बसवून त्याला रिड फटरबरी पाईप बसविला व पुढे अर्धा इंची पिव्हीसी पाईप चार फूट दोन्ही बाजूने बसवून रासायनिक खत देण्याचे पेरणी यंत्र तयार केले. यासाठी त्यांना फक्त ३५० ते ४०० रुपये खर्च आला. पंपामध्ये रासायनिक खत टाकण्यासाठी ग्लायफोसेरची पाच लिटरची कॅन खालून कापून चाडी म्हणून वापरण्यात आली. प्रा.विलास कोटगिरवार यांनी अत्यंत कमी खर्चात तयार केलेल्या या यंत्राचा शेतकºयांना निश्चितच फायदा होवू शकतो.शेतीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने तथा उत्पादन वाढविण्यासाठी अत्यंत कमी खर्चात हे यंत्र तयार केले. टाकाऊपासून टिकाऊ असे खत पेरणी यंत्र आपणही तयार करा.- प्रा.विलास कोटगिरवार, भद्रावती