शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोलगाव येथील शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: May 13, 2016 01:01 IST

राजुरा तालुक्यातील कोलगाव येथील शिक्षकाचे २० एप्रिलला मोठ्या थाटामाटात लग्न झाले.

२० एप्रिलला झाले होते लग्न : विसापूर टोलनाक्या जवळील घटनाबल्लारपूर : राजुरा तालुक्यातील कोलगाव येथील शिक्षकाचे २० एप्रिलला मोठ्या थाटामाटात लग्न झाले. भावी जीवनाचे स्वप्न रंगविले जात असतानाच त्या नवविवाहीत शिक्षकाचा संशयास्पद स्थितीत गळफास घेतलेला मृतदेह बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्गालगत विसापूर टोल नाक्याजवळ रस्त्यापासून २०० फुटाच्या अंतरावर आढळून आला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. जयंत जगन्नाथ बोढाले (३०) असे मृताचे नाव असून तो राजुरा तालुक्यातील कोलगाव येथील रहिवासी आहे. हिंगोली जिल्ह्यातील मारोडा येथील जिल्हा परिषद शाळेत तो शिक्षक म्हणून कार्यरत होता.जयंत बोढाले याचे लग्न राजुरा येथील एका मुलीशी २० एप्रिल रोजी झाले होते. लग्नाचा सोपस्कार पार पडल्यानंतर तो कार्यरत ठिकाणी गेला होता. दरम्यान १ मे रोजी राजुरा येथे सासुरवाडीला आला. तद्नंतर पत्नीसोबत कोलगाव येथे वडिलाकडे राहावयास आला. गुरुवारी सकाळी ५ वाजताच्या दरम्यान त्याला मोबाईलवर एक कॉल आला. त्यावेळी जयंतने १० मिनीटात घरी येतो, असे घरच्यांना सांगुन बाहेर तो पडला. मात्र दोन-तीन तासांचा कालावधी होऊनही तो घरी परतला नाही.नवविवाहीत पत्नीसह घरची मंडळी चिंताग्रस्त झाली. जयंतचा भाऊ प्रविण बोढाले यांनी लगतच्या कढोली व राजुरा येथे जाऊन शोध घेतला. मात्र त्या ठिकाणीही जयंत आढळून आला नाही. दरम्यान प्रविण बोढाले हा मावसभावाला सोबत घेवून चंद्रपूरकडे जात असताना विसापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात माणसांची गर्दी दिसल्याने ते थांबले. रस्त्याच्या बाजुला २०० फूट आत अंतरावर सागाच्या झाडाच्या फांदीला नायलॉन दोराने गळफास घेतलेल्या स्थितीत जयंतचा मृतदेह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याची माहिती बल्लारपूर पोलीस ठाण्याला देण्यात आली.घटनास्थळाचे अवलोकन केला असता, जयंतचा अन्य ठिकाणी खून करून गळफास घेतल्याचा केवळ देखावा निर्माण करण्यात आल्याची चर्चा केली जात होती. गळफास घेतल्यावर त्याची स्थिती दोन्ही पाय मागे वळून गुडग्यावर बसल्यागत होती. त्याची पादत्राणे जवळच होती. मात्र त्याच्याजवळी मोबाईल बेपत्ता होता. घटनेचा तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या घटनेचे गूढ उकलणार आहे. (शहर प्रतिनिधी)