शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

संगणक अर्हता प्रकरणी वेतनवाढ वसुलीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:41 IST

संगणक हाताळणी प्रमाणपत्रासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देणे व होत असलेल्या वेतनवाढ वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केली.

ठळक मुद्देशिक्षण मंत्र्यांची घोषणा : महाराष्ट्र शिक्षक परिषदेची माहिती

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : संगणक हाताळणी प्रमाणपत्रासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देणे व होत असलेल्या वेतनवाढ वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केली. दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन १० व ११ फेब्रुवारीला मुंबई येथील श्री स्वामी विवेकानंद एज्युकेशन सेंटर दहिसर येथे पार पडले.संगणक हाताळणी प्रमाणपत्र प्राप्त न केल्यामुळे जिल्ह्यातील व राज्यातील काही जिल्ह्यात सेवेतून निवृत्त होणाºया प्राथमिक शिक्षकांच्या, त्याचप्रमाणे दिवंगत प्राथमिक शिक्षकांच्या ग्रॅच्युइटीतून दिलेल्या वेतनवाढी वसूल करण्याचा सपाटा वित्त विभागाने लावला आहे. या चुकीच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने (प्राथमिक) वेळोवेळी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे निवेदने पाठवून चर्चा केली. त्यामुळे त्यांनी अधिवेशनात घोषणा केल्याचे सहसरचिटणीस प्रकाश चुनारकर यांनी म्हटले आहे.संगणक अर्हता वसुली संबंधात राज्यपालांकडे निवेदन पाठवून लक्ष वेधले होते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यभरातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेवून शाळा डिजिटल केल्या आहेत. या सर्व शाळांचे वीज देयक सद्या व्यावसायिक दराने आकारणी होत आहे. पुढील आर्थिक वर्षापासून संपूर्ण शाळांची वीज देयके राज्य थेट विद्युत वितरण कंपनीला भरण्याची पद्धतीची योजना तयार करण्यात येत असल्याचे विनोद तावडे यांनी अधिवेशनात सांगितले. प्रलंबित मागण्यासंबंधात १४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक आयोजित केली असून विविध मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे चुनारकर यांनी म्हटले आहे.