शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामात असलेली आरोग्यसेविका निलंबित

By admin | Updated: August 28, 2014 23:42 IST

घुग्घूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नकोडा उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका जननी सुरक्षा योजनेचा धनादेश वटविण्याकरिता गेली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी

घुग्घूस : घुग्घूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नकोडा उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका जननी सुरक्षा योजनेचा धनादेश वटविण्याकरिता गेली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अकस्मात प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि गैरहजर असल्याचा ठपका ठेवून सदर आरोग्य सेविकाला तात्काळ निलंबित केले. सदर कारवाई अन्यायकारक असून ती कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. नकोडा आरोग्य उपकेंद्रात तारा गोपाला भोयर ही आरोग्यसेविका पदावर कार्यरत आहे. तिने १ आॅगस्टला सकाळी स्तनदा व गरोदर मातांसह अंगणवाड्यांना भेटी दिल्या. वी.सी.डी.सी. च्या मुलांना औषधांचे वाटप तथा त्याची उंची, वजन करुन दुपारी १.३० वाजता उपकेंद्राची चावी मदतनिसाकडे देऊन जननी सुरक्षा योजनेचा धनादेश वटविण्याकरिता ती चंद्रपूरच्या पंजाब नॅशनल बँकेत गेली. याचवेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकाऱ्यांनी नकोडा गावाचा आकस्मात दौरा करुन भेट दिली. त्यांना आरोग्य उपकेंद्राला कुलूप दिसले. विशेष म्हणजे तारा भोयर हिचा या कोणताही दोष नाही. मदतनिसाला याबाबत संपूर्ण कल्पना होती. मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यांनी कोणतीही चौकशी न करता तात्काळ तारा भोयर हिच्यावर निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई कर्तव्यावर असताना करण्यात आली असून निलंबनाची कारवाई त्वरीत मागे घ्यावी, अशी विनंती जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. (वार्ताहर)