शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संचालकाच्या अपात्रतेला स्थगिती

By admin | Updated: October 25, 2015 00:49 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीच्या १० मिनीटापूर्वी आर्थिक दुर्बल घटकातून निवडून आलेले रणवीर ठाकरे यांना जिल्हा निबंधक चंद्रपूर यांनी अपात्र ठरविल्याने ...

विभागीय सहनिबंधकांचे आदेश : बाजार समितीची निवडणूक पुन्हा होणारब्रह्मपुरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीच्या १० मिनीटापूर्वी आर्थिक दुर्बल घटकातून निवडून आलेले रणवीर ठाकरे यांना जिल्हा निबंधक चंद्रपूर यांनी अपात्र ठरविल्याने निवडणुकीची प्रक्रिया एकतर्फी झाली होती. परंतु ‘त्या’ संचालकाने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांच्याकडे अपिल करुन अपात्रतेवर स्थगिती मिळविल्याने सभापती व उपसभापतीची निवडणूक पुन्हा नव्याने होण्याचे संकेत आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाची निवडणूक दीड महिन्यापूर्वी झाली होती. हाती आलेल्या निकालानुसार भैया- तिडके गटाचे नऊ व आमदार वडेट्टीवार समर्पित पॅनलला नऊ असे सारखे बलाबल मिळाले होते. त्यानंतर सभापती व उपसभापती पदाची निवडणूक १५ दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. सारखे संचालक दोन्ही गटाकडे असल्याने निवडणूक ईश्वर चिठ्ठीने होईल, असे राजकीय संकेत वर्तविले जात होते. परंतु निवडणुकीच्या १० मिनिटापूर्वी जिल्हा निबंधक चंद्रपूर यांनी रणविर ठाकरे यांचे संचालकपद अपात्र असल्याचे पत्र हाती देताच भैया- तिडके गटाला हादरा बसला व सभापती, उपसभापती दोन्ही पद आमदार वडेट्टीवार यांच्या समर्पित पॅनलला मिळाले. त्यानंतर भैया- तिडके गटाने या निर्णयाच्या विरोधात विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांच्याकडे अपिल केले. त्यानुसार अर्ज कायदा कलम यू/आर ८८ एपिएमसी अंतर्गत आदेशाविरुद्ध स्थगिती देऊन रणविर ठाकरे यांच्या अपात्रतेला स्थगिती दिल्याने सभापती पदाची निवडणूक नव्याने घेण्याचे संकेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)