शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

३५० सापांना जीवदान

By admin | Updated: July 10, 2016 00:44 IST

येथील ‘झेप’ या निसर्ग संस्थेने गेल्या वर्षभरात जवळपास ३५० सापांना जीवदान दिले आहे.

एक वर्ष : झेप निसर्ग संस्थेची नागभीड : येथील ‘झेप’ या निसर्ग संस्थेने गेल्या वर्षभरात जवळपास ३५० सापांना जीवदान दिले आहे. यात विषारी आणि बिनविषारी या दोन्ही प्रकारच्या सापांचा समावेश आहे.मागील वर्षी जून महिन्यात काही समविचारी युवकांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. निसर्गाशी संबधित विविध बाबीवर काम सुरू केले. त्यांनी संस्थेची स्थापना केल्यानंतर तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरही शाळेत जाऊन सापांविषयी जनजागृती केली. या जनजागृतीने या संस्थेच्या सदस्यांचे नाव परिसरात झाल्याने नागभीड आणि पंचक्रोशीत जिथे कोठे साप दिसते, तेथून या सदस्यांना भ्रमणध्वनीवरून निरोप देण्यात येत होते. निरोप मिळाल्यानंतर संस्थेचे सदस्य त्वरित तिथे धावून जातात. त्या सापाला कोणतीही इजा न पोचविता ताब्यात घेऊन जंगलात सुरक्षित स्थळी सोडून देतात. गेल्या वर्षभराचा विचार केला तर या काळात या संस्थेने जवळपास ३५० सापांना जीवदान दिले असल्याची माहिती झेपचे उपाध्यक्ष अमोल वानखेडे यांनी दिली. यात नाग, मन्यार, घोणस हे विषारी तर धामण, पानदिवट, तस्कर, कवळ्या, माती खाया, रूखई या बिनविषारी सापांचा यात समावेश आहे. याशिवाय घोरपड, घुयेरा यांना जीवदान देण्यात आले आहे. याशिवाय या संस्थेने जंगलात पाणवठे तयार करून उन्हाळ्याच्या दिवसात जंगली प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती, हे विशेष. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे, उपाध्यक्ष अमोल वानखेडे, सचिव अमित देशमुख, सहसचिव समिर भोयर, कोषाध्यक्ष पंकज गरफडे, नरेंद्र लोहबरे, विश्वेश्वर गिरीपुंजे, टिकाराम नक्षिणे, वीरू गजभिये आदी संस्थेचे पदाधिकारी नेहमीच तत्पर असतात. (तालुका प्रतिनिधी)साप पकडणे हे जिकरीचे काम आहे. यासाठी शासनाकडून काहीही मिळत नाही. सर्प मित्रांचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परिणामी त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. शासनाने सर्पमित्रांना कमीत कमी विमा संरक्षण तरी द्यावे.- अमोल वानखेडे, उपाध्यक्ष, ‘झेप’