शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:16 IST

१९ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन स्थानिक लोकमान्य विद्यालयाच्या परिसरात ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०१९ दरम्यान होऊ घातल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : १९ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन स्थानिक लोकमान्य विद्यालयाच्या परिसरात ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०१९ दरम्यान होऊ घातल्या आहेत. या सामन्यांच्या आयोजनाची पाहणी करण्याकरिता जिल्ह्याधिकाऱ्यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व आमदार बाळू धानोरकर यांनी आयोजकांना विविध सुचना दिल्या.बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, तहसीलदार सचिन गोसावी, न.प.चे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये देशातून मुलींचे ३५ संघ सहभागी होणार आहेत. त्यांच्या निवासाची आणि सुरक्षिततेच्या संदर्भात काटेकोर सूचना, आ. धानोरकर, महेश्वर रेड्डी आणि जिल्हाधिकाऱ्यांची यावेळी आयोजकांना दिल्या. भोजन व्यवस्था, वैद्यकीय उपचार, स्पर्धेच्या ठिकाणी अग्निशामक दल, अखंडीत विद्युत पुरवठा यासंबंधी आढावा घेण्यात आली. प्रेक्षक गॅलरी उभी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, लोक शिक्षण संस्था वरोरा, चंद्रपूर जिल्हा मल्टीपर्पज आणि व्हॉलीबॉल असोसिएशन व वरोरा स्पोटर्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. बैठकीचे प्रास्ताविक आणि आयोजनाची विस्तृत माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी दिली. आभार गजानन जिवतोडे यांनी मानले. संस्थेचे कार्यवाह श्रीकृष्ण पाटील, डॉ. मिलिंद देशपांडे उपस्थित होते.