शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्यांश’ साहित्यिक व रसिकांमधील संवादसेतू

By admin | Updated: August 29, 2015 01:22 IST

साहित्यक्षेत्रात वावरत असताना अनेक नवोदित साहित्यिक कलावंत व लेखकांना साहित्यप्रवाहात सामावण्याची इच्छा असते.

चंद्रपूर : साहित्यक्षेत्रात वावरत असताना अनेक नवोदित साहित्यिक कलावंत व लेखकांना साहित्यप्रवाहात सामावण्याची इच्छा असते. परंतु मोठ्या साहित्य संस्थांच्याही काही अडचणी असल्याने त्यांना मर्यादा येतात व अशावेळी छोट्या साहित्य संस्था नवोदित लेखकांसाठी महत्वपूर्ण ठरतात. चद्रपूरच्या सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंचाने ही भूमिका प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नवोदित लेखकांसाठी ही संस्था माहेरघर आहे. असे म्हणायला हरकत नाही. लेखक व रसिक यांच्यातल्या संवादाला जोडण्याकरिता सूर्यांश संवादसेतूचे काम करीत आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कादंबरीकार व साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. याप्रसंगी चंद्रपुरातील प्रसिद्ध चिकित्सक डॉ. अशोक वासलवार अध्यक्षस्थानी तर ख्वाडा चित्रपटाचे गीतकार विनायक पवार, प्रसिद्ध समीक्षक डॉ. श्याम मोहरकर, पावसाच्या कवीसंमेलनाचे अध्यक्ष विष्णू सोळंकी आणि विदर्भ साहित्य संघाचे मोहिते उपस्थित होते. सूर्यांशतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून साहित्य क्षेत्रात मागील सहा वर्षापासून पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. बाबुराव कोंतमवार स्मृती सूर्यांश पुरस्कार प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांना कविता लेखनासाठी, अशोकसिंग ठाकूर पुरस्कृत कादंबरी पुरस्कार मनोहर पाटील यांना ढलवा कादंबरीसाठी, गुलाबराव पेंदाम स्मृती कवितासंग्रह विनायक येवले यांच्या ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरुन’ या कवितासंग्रहाला आणि प्रा. दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार साधना लव्हाटे यांच्या ‘रंग गहीरे’ या कथासंग्रहाला तसेच गीता रायपूरे यांना नवोन्मेष पुरस्कार डॉ. शोभणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साधना लव्हाटे यांच्या वतीने रावजी चवरे व लोकनाथ यशवंत यांच्या वतीने आशीष देव यांनी पुरस्कार स्वीकारला. एक हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेने घेतलेल्या पावसाच्या कवितांच्या स्पर्धेत विजेते दिगंबर शिंदे, नरेशकुमार बोरीकर, सुनील पाटील, नीता कोंतमवार व सुरेश गारघाटे या कवींनाही सन्मानित करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)