शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणार्थ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:10 IST

सुक्ष्म गुंतवणूक निधीअंतर्गत ग्राम संघाना चांदा क्लबवर आयोजित कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप शुक्रवारी करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.

ठळक मुद्देलाभार्थी आनंदी : पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुक्ष्म गुंतवणूक निधीअंतर्गत ग्राम संघाना चांदा क्लबवर आयोजित कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप शुक्रवारी करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.त्यामध्ये जनकल्याण ग्रामसेवा संघ, जिजाऊ ग्रामसेवा संघ, भाग्यलक्ष्मी ग्रामसेवा संघ, साईबाबा ग्रामसेवा संघ व सावित्रीबाई फुले ग्रामसेवा संघ या ग्रामसेवा संघाना एनआरएलएमअंतर्गत वाटप करण्यात आले. जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील निर्मल स्वयंसहायता समूह, ओमसाई व शेवंती स्वयंसहायता समूह या समूहांना इंडियन बँकेकडून धनादेश वितरीत करण्यात आले.१ एप्रिल २०१८ ते १ जानेवारी २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व बँकांनी चार हजार ४४१ गटांना ४० कोटी ७० लाख ८१ हजार रुपयांचे कर्ज वाटप करून राज्यात सर्वात जास्त कर्ज वाटप करणारा जिल्हा असे नाव लौकिक केले आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश गटातील सेंद्रीय शेती करणारे शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतूक करण्याकरिता वाहन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात आला. यामध्ये कोरपना तालुक्यातील पकडीगुडम सेंद्रीय शेती गट धानोलीचे लाभार्थी लिंगा वेट्टी यांना ७७० किलो वाहक क्षमता असणारे वाहन खरेदीसाठी बँकेतर्फे चार लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील सेंद्रीय भात उत्पादक गट किन्ही येथील लाभार्थी शंकर अर्जुन गव्हारे यालासुद्धा कर्ज देण्यात आले.प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरणएनआरएलएमअंतर्गत दिनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेमार्फत चिमूर तालुक्यातील निखील श्रीकृष्ण शामकुळे, संदीप पुरूषोत्तम लोखंडे, पंकज शामराव शेंडे व दर्शना दयाराम मून या प्रशिक्षण पूर्ण करणाºया प्रशिक्षणर्थ्यांना पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. एनआरएलएमअंतर्गत दिनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेमार्फत चिमूर तालुक्यातील निखील श्रीकृष्ण शामकुळे, संदीप पुरूषोत्तम लोखंडे, पंकज शामराव शेंडे व दर्शना दयाराम मून या प्रशिक्षण पूर्ण करणाºया प्रशिक्षणर्थ्यांना पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.