शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी बाकावर असलो तरी चांगल्या कामासाठी सहकार्य

By admin | Updated: November 26, 2014 23:03 IST

जीवनात अनेक चढउतार येतात. समाजातील शेवटच्या माणसाचे दु:ख आपल्याला माहित आहे. आपणही त्या दु:खातून गेलो आहे. वेदना काय असतात, याची वास्तविकता आपल्याला चांगली ठाऊक आहे.

मिट द प्रेस : विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या भावनाचंद्रपूर : जीवनात अनेक चढउतार येतात. समाजातील शेवटच्या माणसाचे दु:ख आपल्याला माहित आहे. आपणही त्या दु:खातून गेलो आहे. वेदना काय असतात, याची वास्तविकता आपल्याला चांगली ठाऊक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सुटाव्या, अशी आपली भावना आहे. विरोधी बाकावर असलो तरी चांगल्या कामासाठी सत्ताधाऱ्यांना सहकार्य करायचे. विरोधासाठी विरोध करायचा नाही, अशी भूमिका आपली असल्याचे मत काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेता आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मीट द प्रेसमध्ये ते बोलत होते.विधीमंडळ उपगटनेता म्हणून पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकली आहे. ही जबाबदारी आपण समर्थपणे पेलणार आहो. चांगल्या गोष्टी सभागृहात आणण्यावर आपला भर आहे. सरकार स्थिर राहावे, जनतेची कामे व्हावे, अशी आपली इच्छा आहे. सत्तेत नाही म्हणून लाजायचे नाही तर जनतेचे कामे करीत रहायचे, असे आपले मत आहे.सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी आहे. राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करणे गरजेचे आहे. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासन दिली. मात्र आता ते विसरत आहे. कापूस, सोयाबीन, धान आदी पिकांना योग्य भाव देवू असे निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते सांगत होते. आता मात्र त्यांनी आश्वासन पाळले नाही. कवडीमोल भावात सोयाबीन, धानाची खरेदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करीत आहे. त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देणे गरजेचे आहे.ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात २०१५ मध्ये १० हजार नागरिकांना दृष्टी देण्याचे आपले ध्येय आहे. यासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ आपण आहो. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे वेगळा विदर्भ त्वरित केल्यास आपणाला आनंद आहे. मात्र चार वर्ष सत्ता भोगायची आणि शेवटच्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर वेगळा विदर्भ करायचा, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांची असू शकते, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.यावेळी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आमदार वडेट्टीवार यांचा श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रमोद उंदिरवाडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तथा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन आशिष आंबाडे, प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे सचिव मंगेश खाटीक तर, आभार जितेंद्र मशारकर यांनी मानले.(नगर प्रतिनिधी)