शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आधार संस्थेकडून मिळाला स्वर्गयात्रेला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:07 IST

मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू कुणाची वाट बघत नसतो. परिवारातील सदस्याचे जाणे सर्वांना चटका देणारे असते. कुटुंबातील व्यक्तीच्या परिवाराला सांत्वनेसोबतच आर्थिक मदत देण्याच्या हेतूने आधार संस्थेने स्वर्ग यात्रा निधीची नवीन संकल्पना साकारली. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संस्थेचे पदाधिकारी घरी जाऊन सांत्वन करून चार हजार रुपयांची मदत करतात.

ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम : सांत्वनेसोबतच मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू कुणाची वाट बघत नसतो. परिवारातील सदस्याचे जाणे सर्वांना चटका देणारे असते. कुटुंबातील व्यक्तीच्या परिवाराला सांत्वनेसोबतच आर्थिक मदत देण्याच्या हेतूने आधार संस्थेने स्वर्ग यात्रा निधीची नवीन संकल्पना साकारली. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संस्थेचे पदाधिकारी घरी जाऊन सांत्वन करून चार हजार रुपयांची मदत करतात.मूल येथील संतोष रानगरवार, प्रशांत गटलेवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी आधार संस्थेची सामाजिक दृष्टिकोणातून स्थापन केली. आधार संस्थेअंतर्गत कुटुंबातील सर्व व्यक्तींकडून २२ रुपये सभासद शुल्क घेतल्या जाते. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना चार हजार रुपयांची मदत देऊन सांत्वना करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. जात आणि धर्माचा भेद न मानता सर्वांना समान मानल्याने स्वर्ग यात्रा निधीची सभासद संख्या वाढत असल्याचे दिसून येते. अल्पावधीत सुरु झालेल्या या उपक्रमात १ हजार ४९७ व्यक्तींची नोंदणी झाली. आतापर्यंत २ लाख ४४ हजार ८६० रुपये जमा झाले आहे. १५ सभासदांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने घरी जाऊन आर्थिक मदत देण्यात आली. सभासद संख्या वाढल्यानंतर १० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाºयांनी केला आहे. जाती व धर्माच्या पलीकडे जाऊन समधर्म समभाव जोपासत आधार संस्थेने सुरू केलेला उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक घटकांचा विचार केला तर माणुसकीची चळवळ सुरू होते. आर्थिक फायदा व्हावा, यासाठी काही मंडळी धडपडत असताना दिसतात. ही संस्था यापासून कोसो दूर आहे. गरीब कुटुंबियांसाठी काही तरी देणे लागते, ही भावना संपत आहे. समाजातील लहान व गरजू व्यक्तीला आधार देणे तेवढेच गरजेचे आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर निर्माण होणारी आर्थिक अडचण आधार संस्थेच्या मदतीने काही प्रमाणात दूर होते. स्वर्ग यात्रा निधीच्या सदस्यांमध्ये वाढ होत आहे. सभासद संख्या वाढल्यास पुन्हा काही नव्या योजनांची सुरूवात केली जाणार आहे. ही संस्था प्रेरणादायी असून सर्वांनीच पाठबळ दिल्यास माणुसकीची प्रतिष्ठा वाढेल. याच कारणांमुळे शहरातील समाजातील जबाबदार घटक या संस्थेकडे आशावादी दृष्टीने बघत आहे.