शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकरांना योग्य व स्वच्छ पाणी पुरवठा करा

By admin | Updated: May 25, 2017 00:28 IST

शहर महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर आणि राहुल पावडे सभापती स्थायी समिती यांनी मंगळवारला सकाळी ८ वाजता शहरात असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली.

अंजली घोटेकर : शहरातील पाण्याच्या टाकीची पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर आणि राहुल पावडे सभापती स्थायी समिती यांनी मंगळवारला सकाळी ८ वाजता शहरात असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली. यावेळी पाण्याची टाकी व फिल्टर साफ करुन शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना महापौर अंजली घोटेकर यांनी कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारीवर्गांना दिल्या.मागील काही दिवसांपासून शहरात दूषित पाण्याचा पूरवठा होत आहे. तसेच पाण्याची वास येणे, पाण्याच्या अपूरा पुरवठा व दूषित पाण्यामुळे लोकांच्या प्रकृतीवर होणारा परिणाम याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होती. त्या तक्रारीच्या निवारणासाठी महापौर अंजली घोटेकर यांनी रामनगर पाणी टाकी, तुकूम फिल्टर प्लँट, मित्र नगर, वडगाव पाणी टाकी, घुटकाळा पाणी टाकी, बंगाली कॅम्प पाणी टाकी, बायपास व बाबूपेठ, टागोर शाळा, विठ्ठल मंदीर परिसरातील पाण्याच्या टाकीची पाहणी केली. या पाहणीत काही ठिकाणी नागरिकांनी अवैध कनेक्शन घेतले आहे. त्यामुळे पाणी योग्यरित्या नागरिकांपर्यंत पोहचत नाही. काही ठिकाणी इलेक्ट्रीक पंप लावल्या जातात. परिणामी पाणी पोहचत नाही. त्यामुळे महापौर अंजली घोटेकर यांनी कंत्राटदार व अभियंता बोरीकर यांना अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.तसेच सर्व अवैध कनेक्शन ताबडतोब काढून घ्यावी, ज्या ठिकाणी बोअरिंग नांदूरस्त आहेत, त्या सर्व बोअरिंग तात्काळ दुरुस्त करून सुरू कराव्यात. नागरिकांना योग्यरित्या पाणी पोहचण्यिाकरिता टँकरचा वापर करावा. काही पाण्याच्या टाकीजवळ अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण ताबडतोब काढून घेण्याचे निर्देश शहर अभियंता बारई यांना महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.तसेच संपूर्ण पाण्याच्या टाक्या किती वाजता भरल्या जातात, कंत्राटदाराकडे असणारे कर्मचारी, फिल्टर प्लांट तुकूमच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याचा आढावा महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे योगेश समरीत यांना देण्याचे निर्देश दिले.पाण्याच्या टाक्या साफ करणे, वॉटर फिल्टर प्लांट साफ करण्याचे निर्देशही कंत्राटदारास दिले. तसेच शहरवासियांना पिण्याचे पाणी योग्य व मूबलक प्रमाणात देण्याचे काम पालिकेचे आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी व कंत्राटदाराने या कामात कुचराई करू नये अशी तंबी देखील महापौर अंजली घोटेकर यांनी दिली आहे. यावेळी सभापती देवानंद वाढई, सभापती आशा आबोजवार, नगरसेविका शितल गुरनुले, नगरसेवक सविता कांबळे, वंदना तिखे, शितल कुळमेथे, शिला चौव्हान, ज्योती गेडाम, कल्पना बगुलकर, निलम आक्केवार, आदी उपस्थित होते.