शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड जंक्शनमध्ये रेल्वेच्या सुपर गाड्यांचे थांबे अजून बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

नागभीड हे पूर्व विदर्भातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरकडे रेल्वेगाड्या रवाना होतात. हे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे दिले होते. पहिला लॉकडाऊन लागेपर्यंत हे थांबे कायम होते. मात्र, लॉकडाऊन लागल्यानंतर हे थांबे बंद करण्यात आले. आश्चर्याची बाब अशी की, आताही हे थांबे बंदच आहेत.

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : लॉकडाऊनपासून नागभीड रेल्वे जंक्शनमध्ये एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे अद्यापही बंदच आहेत. हे थांबे पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. नागभीड हे पूर्व विदर्भातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरकडे रेल्वेगाड्या रवाना होतात. हे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे दिले होते. पहिला लॉकडाऊन लागेपर्यंत हे थांबे कायम होते. मात्र, लॉकडाऊन लागल्यानंतर हे थांबे बंद करण्यात आले. आश्चर्याची बाब अशी की, आताही हे थांबे बंदच आहेत.या संदर्भात विश्वसनीय माहितीनुसार गाडी क्र. १२८५१ बिलासपूर- चेन्नई एक्स्प्रेस आणि गाडी क्र. १२२५२ कोरबा- यशवंतपूर वैनगंगा एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेस गाड्यांचे लॉकडाऊनपूर्वी नागभीडला थांबे होते. या ठिकाणाहून चिमूर, भिवापूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड व अन्य ठिकाणी एक्स्प्रेसचा थांबा असल्यामुळे प्रवासी येथून प्रवास करायचे. मात्र, या दोन्ही एक्स्प्रेसचा थांबा सुरू न केल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.

नागभीडला दोन  बर्थचा राखीव कोटा- एक्स्प्रेस गाड्याचे थांबे लक्षात घेऊन रेल्वेने दोन बर्थचा राखीव कोटा मंजूर केला आहे. मात्र आता एक्स्प्रेस गाड्यांचे थांबेच बंद असल्याने या राखीव बर्थचा कोणताही उपयोग नाही.

या गाड्यांचेही हवेत थांबेरक्षोल- हैदराबाद (गाडी क्रमांक १७००६) आणि दरभंगा- सिकंदराबाद ( गाडी क्रमांक १७००८) या दोन एक्स्प्रेस गाड्या या मार्गावरून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्या, तरी नागभीड येथे या गाड्यांचे थांबे अद्यापही देण्यात आले नाहीत. या गाड्यांचे थांबे देण्यात यावेत, अशी मागणी असली तरी या मागणीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याशिवाय जसडोह (झारखंड)- गोवा आणि बुद्धगया- चेन्नई या दोन नवीन गाड्याही या मार्गाने सुरू झाल्याची माहिती आहे. या गाड्यांचे नागभीड येथे थांबे दिल्यास रेल्वेला फार मोठा प्रवासीवर्ग मिळू शकतो. 

टॅग्स :railwayरेल्वे