शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील ‘संडे मार्केट’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:06 IST

महानगर परिषदेतर्गंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट येथे दर रविवारी संडे मार्केट भरत होता. यामध्ये शहरातील तसेच जिल्ह्याभरातील शेकडो छोटे-मोठे व्यावसायिक हातठेल्यावर विविध वस्तुंची विक्री करीत होते. मात्र नागपूर खंडपीठाने केवळ नऊ दुकानादारांना याठिकाणी बसण्याची परवानगी दिली असून प्रतिवादींना येत्या ३ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आजचा संडे मार्केट भरला नसल्याने याठिकाणी शुकशुकाट दिसून आला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगर परिषदेतर्गंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट येथे दर रविवारी संडे मार्केट भरत होता. यामध्ये शहरातील तसेच जिल्ह्याभरातील शेकडो छोटे-मोठे व्यावसायिक हातठेल्यावर विविध वस्तुंची विक्री करीत होते. मात्र नागपूर खंडपीठाने केवळ नऊ दुकानादारांना याठिकाणी बसण्याची परवानगी दिली असून प्रतिवादींना येत्या ३ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आजचा संडे मार्केट भरला नसल्याने याठिकाणी शुकशुकाट दिसून आला.चंद्रपुराती संडे मार्केट नावाने प्रसिद्ध असलेल्या बाजारात सुमारे अडीचशे ते तीनशेच्या सुमारास नागरिक दुकाने थाटत होती. बाजाराच्या गर्दीमुळे वाहतूक खोळबंत होती. मात्र त्यामुळे बाजार हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत आठ जणांनी सिव्हिल कोर्टात याचिका दाखल केली. तीनशे जणांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. कोर्टाने त्यांना संरक्षण दिले. याविरूध्द मनपाने जिल्हा न्यायालयात अपील केली. जिल्हा न्यायालयाने आठ जणांची मागणी रद्द करून मनपाची अपील मान्य केली. जिल्हा न्यायालयाच्या या आदेशाला आठ जणांनी हायकोर्टात आव्हान दिले. न्या. सुनील शुक्रे यांनी केवळ आठ जणांना बाजारात बसण्याची परवानगी दिली. त्यामुळे याठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.महानगरपालिकेने पर्यायी व्यवस्था करावीडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट येथे मागील काही महिन्यांपासून दर रविवारी संडे मार्केट भरत होता. मात्र त्याठिकाणी केवळ नऊ जणांना बसण्याची परवानगी न्यायालयाने दिल्याने रविवारी भरणारा संडे मार्केट बंद झाला आहे. परिणामी येथे बसणाºया व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे लक्ष घालून तातळीने उपाययोजना करावी, अशी मागणी याठिकाणी बसणाºया व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.