शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील संडे मार्केट कायम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:06 IST

उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार संडे मार्केट आता बंद झाले असून कुठल्याही विक्रेत्यांना आता आंबेडकर चौक ते बिनबा गेट रोडवर कुठल्याही स्वरूपाची दुकाने लावता येणार नाही, अशी मािहती मनपाचे जनसंपर्क अधिकारी युद्धिष्ठर रैच यांनी दिली.

ठळक मुद्देमनपाचा आदेश : अन्यथा कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार संडे मार्केट आता बंद झाले असून कुठल्याही विक्रेत्यांना आता आंबेडकर चौक ते बिनबा गेट रोडवर कुठल्याही स्वरूपाची दुकाने लावता येणार नाही, अशी मािहती मनपाचे जनसंपर्क अधिकारी युद्धिष्ठर रैच यांनी दिली.मागील एक ते दीड वर्षापासून बिनबा गेट मार्गावर दर रविवारी विक्रेत्यांद्वारे अनधिकृतरित्या व्यवसाय केला जात होता. या संडे मार्केटचे स्वरूप आले होते. सदर मार्केटमध्ये कुठल्याही स्वरूपाची शिस्त पाळली जात नसल्याने तेथील रहिवासी व जागरूक नागरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे मनपा प्रशासनाने ही दुकाने इतरत्र हलविण्यास कळविले होते. परंतु सदर विक्रेत्यांनी त्याविरूद्ध न्यायालयाचा मार्ग पत्करला होता. दरम्यान, प्रथम जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने मनपाची भूमिका योग्य ठरवून संडे मार्केट बंद करण्याचा आदेश दिला आहे.याआधी जिल्हा सत्र न्यायालयाने बंदीचा आदेश दिल्यानंतरही व्यावसायिकांनी रविवारी दुकान थाटून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला होता. याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली होती, असेही जनसंपर्क अधिकारी रैच यांनी कळविले आहे.