शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याचा पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:46 IST

चंद्रपूर जिल्हा उन्हाळ्यासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. तप्त उन्हाच्या झळा आता चंद्रपूरकरांना बसू लागल्या आहेत. मागील आठवड्यापासून चंद्रपूरसह जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर @ ४२.५ : दाहकतेमुळे नागरिक हैराण

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा उन्हाळ्यासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. तप्त उन्हाच्या झळा आता चंद्रपूरकरांना बसू लागल्या आहेत. मागील आठवड्यापासून चंद्रपूरसह जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सुर्याचा पारा ४२.५ अंशापर्यंत गेला आहे. आज शुक्रवारी ४२.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असली तरी तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून याचा जनजीवनावरही परिणाम पडत आहे. याशिवाय पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न तीव्रतेने उभा ठाकला आहे.‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्याला ठाऊक आहे. सर्वाहून अधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागतात, असा अनुभव दरवर्षीच नागरिकांना येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी महिना साधारण गेला. आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान घटले होते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहून यावर्षी उशिराने लागली. मात्र अवकाळी पावसाचा गारवा फार काळ टिकला नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऊन्ह तापू लागले.आता सुर्याने आपला प्रकोप दाखविणे सुरू केले आहे. मार्च महिन्याच्या शेवटचा दिवस शिल्लक आहे. सुर्याने अक्षरश: आग ओकणे सुरू केले आहे. बुधवार, गुरुवार आणि आज शुक्रवारीही सुर्याचा पारा वाढलेलाच होता. या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत.ग्रामीण भागात पाण्यासाठी जीवघेणा संघर्षजसजशे उन्ह तापू लागले आहे, तसे जलाशय, नदी, तलाव-बोड्यातील पाणी आटू लागले आहे. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटत चालल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. एका गावातील एकाच विहिरीवर दोन गावातील गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाही.‘मे’ हीट कसा असेल?आता दोन दिवसाने एप्रिल महिना सुरू होत आहे. दुसरीकडे आतापासूनच सूर्याने नागरिकांच्या नाकीनऊ करून टाकले आहे. तप्त सूर्यकिरणे असह्य होत आहेत. आताच हे हाल आहेत तर पुढे मे महिन्यात कसे होईल, याचा धसका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आतापासून घेतला आहे. मे महिन्यात येणाºया उष्णतेची लाटेचा सामना कसा करावा, या चिंतेत चंद्रपूरकरांची झोप उडाली आहे.