शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याआधीच वरोऱ्यात पाणी प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:13 IST

शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देदोन दिवसांचा अल्टिमेटम : महिलांचा नगर परिषदेवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.नगरसेविका चंद्रकला चिमूरकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन मुख्यधिकारी व नगराध्यक्ष अहतेशम अली यांना दिले. सदर मागण्या त्वरित मान्य न झाल्यास नगर परिषदेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.वरोरा नगर परिषद ही शेकडो वर्ष जुनी असूनसुद्धा नागरिकांना आपल्या मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. नगर परिषदेत आजपर्यंत अनेक पक्षाच्या सत्ता बसल्या. मात्र नागरिकांच्या मुलभूत सुविधा अद्यापही मिळालेल्या नाही. काही प्रभागामध्ये उन्हाळा येण्याआधीच पाणी समस्येने डोके वर काढले असून खांजी वॉर्ड येथे मागील एक महिन्यापासून व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने थंडीच्या दिवसात नागरिकांचे घसे कोरडे पडले आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनसुद्धा नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी चंद्रकला चिमूरकर यांच्या नेतृत्वात पाणी टंचाईविरोधात नगर परिषदेवर एल्गार करीत शेकडो महिलांसह मोर्चा काढून मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, पाणी पुरवठा सभापती छोटूभाई शेख व नगराध्यक्ष अहतेशाम अली यांना निवेदन देवून समस्या सोडविण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. अन्यथा समस्येचे निराकरण न झाल्यास मटका फोड आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका चिमूरकर यांनी दिला.वरोरा क्षेत्रामध्ये सुरु झालेली पाणी पुरवठा योजना ही १९७४ सालची असल्याने आताचा वाढलेला शहराचा भाग व मागणी आणि पुरवठा याचा तुटवडा पडला असल्याने बºयाच ठिकाणी अशा अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे पाण्याची टाकी पूर्ण भरली जात नसल्याने बºयाच भागात पाणी फोर्सने जात नाही. त्यामुळे पाणी पोहचत नसल्याने ही अडचण येत आहेफ. पाणी पुरवठा एक दिवस आड दिल्याने सर्व भागात बरोबर पाणी मिळेल. यासाठी १ फेब्रुवारीपासून त्याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल.- सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी.