शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी मूग पिकातही शेतकऱ्यांना निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST

बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला खरिपातील कापूस पिकाची लागवड केली होती. पीक चांगले भरले होते. परंतु ऐनवेळी बोंड अळीच्या ...

बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला खरिपातील कापूस पिकाची लागवड केली होती. पीक चांगले भरले होते. परंतु ऐनवेळी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने ते पीकही गेले. केलेला खर्चही गेला.

या खरिपातील केलेला खर्च बी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरांचा खर्च काढायचा कसा, या विचारात पळसगाव परिसरातील कळमना, आमडी, कवडजाई, किन्ही, कोर्टी, मानोरा, इटोली, दहेली येथील शेतकऱ्यांनी कापूस उपटून, धसकटे पेटवून चांगली मशागत करून उन्हाळी मुगाची बियाणे कृषी केंद्रातून खरेदी करून लागवड केली. मुगाला दरवर्षी सात ते आठ हजारांपर्यंत भाव असतो. उत्पादन खर्चही कमी असतो. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग पिकाची लागवड केली. त्या मुगाला पेरणीच्या वेळी खत देण्यात आले. पाण्याच्या २ ते ३ पाळ्या देखील देण्यात आल्या. परंतु खर्चाच्या मानाने पहावे तसा मूग बहरला नाही.

काही ठिकाणी व्हायरसजन्य रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. मुगाला बघाव्या तशा शेंगा लागलेल्या दिसत नाही. कापूस व सोयाबीन सारखीच अवस्था मूग पिकाची झाली आहे. या पिकातून तरी आपला वार्षिक खर्च निघेल. डोक्यावरील कर्ज कमी होईल, या आशेने शेतकरी जगत होता. परंतु या पिकात देखील शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा भंग झाल्यागत स्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी शेती करण्याकरिता खासगी बँकांकडून तर काहींनी सहकारी सोसायटीकडून कर्ज उचलले आहे. कापसाने ही शेतकऱ्यांना निराश केले. थोडी आशा मूग पिकाची होती पण त्यातही तोकडे उत्पादनच मिळेल, अशी अवस्था आहे. त्यामुळे पुढील हंगामात नेमक कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.