शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पीडित महिला बनणार मनोधैर्य योजनेतून सक्षम

By admin | Updated: January 25, 2017 00:47 IST

बलात्कार, बालकावरील लैगिंक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनवर्सन करुन..

शासनाचे क्रांतिकारी पाऊल : तीन लाखांपर्यंत अर्थसहाय्यचिमूर : बलात्कार, बालकावरील लैगिंक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनवर्सन करुन त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने ‘मनोधैर्य योजना’ कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या सहाय्याने या पीडित महिलांना सक्षम बनण्यास मदत होणार आहे.या योजनेतून पीडितांना किमान दोन ते तीन लाखापर्यंतची आर्थिक मदत देण्याची तरतुद केली आहे. पीडित महिलेला सर्व शक्तीनिसी आधार देवून तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देवून तिला सन्मानाने उभे करण्यासाठी मनोधैर्य योजना शासनाचे क्रांतिकारी पाऊल म्हणून ओळखले जात आहे. बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला, बालके व त्यांच्या वारसदारांना तातडीने आर्थिक मदत आणि मानसोपचाराची सेवा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना गरजेनुसार निवारा शिक्षण व व्यावसायीक प्रशिक्षण या सारख्या आधार सेवा उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.या योजने अंतर्गत बलात्कार व बालकावर लैगिंक अत्याचार प्रकरणी दोन लाख रुपये व विशेष प्रकरणामध्ये कमाल तीन लाख रूपयाचे अर्थसहाय्य देण्याची तरतुद आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकास अंधत्व आल्यास, त्यांचा चेहरा विद्रुप झाला अथवा कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये आणि अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांना ५० हजार रुपये इतक्या अर्थसहाय्यायची तरतुद या योजनेत करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत या योजनेनुसार अर्थसहाय्य देण्याची तरतुद आहे. या योजनेमुळे समाजात विकृत मानसीकतेला बळी पडलेल्या महिलांना नव्याने समाजात सक्षण होण्यास मदत होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)