शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ढोल ताशांच्या गजरात सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानी व चंद्रपुरात जंगी स्वागत

By राजेश भोजेकर | Updated: October 13, 2023 16:46 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला नागपूर विमानतळ परिसर

चंद्रपूर : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नागपूर व चंद्रपुरात ढोल-ताशांच्या गजरात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रपूर, वर्धा, नागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा परिसर फुलुन गेला होता.

विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पेशवेकालीन टोपी, शाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला. आनंदी कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी मुनगंटीवार यांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी व येत्या काळात भारतात आणण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले. त्यामुळे आपण स्वत:ला अत्यंत भाग्यवान मानतो. वाघनखांसह महाराजांची जगदंबा तलवार आणि लंडनच्या संग्रहालयातील महाराष्ट्राच्या वारसाची साक्ष देणाऱ्या इतर वस्तुही लवकरच भारतात येण्याकरीता आपण पूर्ण प्रयत्न करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

लंडन आणि जपानचा दौरा आटोपल्यानंतर आपण भारतात परतलो त्यावेळी आपले भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या या प्रेम आणि आपुलकीने आपण भारावलो आहोत. हा क्षण आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही, असे भाव मुनगंटीवार व्यक्त केले.

भारत-पाक सिमेवर महाराजांचा पुतळा उभारणार

आम्ही पुणेकर या संस्थेने श्रीनगरातील कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सिमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन त्यांना यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सिमेवर हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहुनच धडकी भरेल, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज