शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चार युवकांच्या यशाने उंचावली जिल्हावासीयांची मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST

आदित्य जीवने वरोरा येथील आदित्य चंद्रभान जीवने या युवकाने ३९९ व्या रँकिंगने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आदित्य हा मेकॅनिकल ...

आदित्य जीवने

वरोरा येथील आदित्य चंद्रभान जीवने या युवकाने ३९९ व्या रँकिंगने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आदित्य हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. वडील आनंदनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक, तर आई शिक्षिका आहे. पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते. मात्र, ध्येयपूर्तीसाठी पुन्हा तयारीला लागल्याचे आदित्यने सांगितले. परीक्षेनंतर काही दिवसांतच मला कोरोना संसर्ग झाला. जणू मरणाच्या दारातून बाहेर आलो. या कालावधीत मित्रांनी केलेले सहकार्य कदापिही विसरू शकत नाही. प्रशासनातील उच्चपदावर येऊन जनसेवा करण्याचे माझे ध्येय निश्चित होते. नियोजनबद्ध प्रयत्न केले आणि यश मिळाले. विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास केल्यास यश दूर नाही, असा संदेशही आदित्यने दिला.

देवव्रत मेश्राम

सावली येथील देवव्रत वसंत मेश्राम याने ७१३ वी रँक प्राप्त करून यूपीएससी परीक्षेत बाजी मारली. चौथीपर्यंतचे शिक्षण जि.प. शाळा सावली येथून घेतले. देवव्रतचे वडील विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. खडकपूर आयआयटीत इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी वडिलांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर आईने तीनही मुलांना उत्तम संस्कार दिले. खडगपूरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली येथे यूपीएसीची तयारी करीत होता. कुटुंबातील सर्व भावंडे उच्चविद्याविभूषित असून, मोठा भाऊ गोवा येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात, तर बहीण मुंबईत प्राध्यापक आहे. कुटुंबातून कुणीतरी प्रशासकीय सेवेत जावे, असे वडिलांचे स्वप्न होते. त्याचदृष्टीने मी ध्येय ठरविले. कठोर परिश्रम घेतले. अखेर स्वप्नपूर्ती झाली, याचा मनस्वी आनंद असल्याच देवव्रतने सांगितले.

सुबोध मानकर

मूल येथील सुबोध मानकर या युवकाने ६४८ रँकने यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. सुबोधने प्राथमिक शिक्षण बालविकास प्राथमिक शाळा व माध्यमिक शिक्षण नवभारत विद्यालय मूल येथे पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण नागपुरातील एम.पी. देव धरमपेठ सायन्स कॉलेज व पूणे येथील व्हीआयटी कॉलेजमधून पदवी तसेच बीटेक पदवीचे शिक्षण घेतले. तेव्हापासून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१८ मध्ये यूपीएसी परीक्षा दिली. त्यादरम्यान इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस सिकंदराबाद येथे निवड झाली. सुबोध मानकर हा सध्या रेल्वे विभागात प्रशिक्षण घेत आहे. सिकंदराबादमध्ये राहूनच अभ्यास पूर्ण केला. कुटुंबीय व शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मला हे यश मिळाल्याचे सुबोधने सांगितले. जिद्द, चिकाटी व परिश्रमाची तयारी असेल, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा गड सहजपणे सर करू शकतात. सुबोधचे वडील रमेश मानकर हे सेवानिवृत्त शिक्षक, आई उषा गृहिणी, तर भाऊ नामांकित कंपनीत अभियंता आहे.