शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस नगर परिषदेचा विषय समितीपुढे सकारात्मकपणे मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:40 IST

घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा बहाल करण्यात यावा, याबाबतचा विषय नवीन नगर पंचायत व नगर परिषद स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीपुढे सकारात्मकपणे मांडणार अशी ग्वाही या समितीचे अध्यक्ष व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी सचिव महेश मेंढे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाला दिली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : शिष्टमंडळाला ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा बहाल करण्यात यावा, याबाबतचा विषय नवीन नगर पंचायत व नगर परिषद स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीपुढे सकारात्मकपणे मांडणार अशी ग्वाही या समितीचे अध्यक्ष व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी सचिव महेश मेंढे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाला दिली.घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त व्हावा, या अनुषंगाने विधान परिषद उपसभापतींनी बैठक बोलावून अधिसूचना काढण्याचे निर्देश चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.यानंतर नवीन नगर पंचायत व नगर परिषद स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली.यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सदर बाब सकारात्मक घेतली आहे. समितीपुढे घुग्घुस नगर परिषदेचा विषय सकारात्मकपणे मांडणार असल्याची मंत्रीमहोदयांनी दिली. तसेच लवकरात लवकर शासनास प्रस्ताव मागवून घेण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याची माहिती शिष्टमंडळाने एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.तसेच समितीचे सदस्य ना. दीपक सावंत, ना. प्रकाश मेहता, ना. गिरीष महाजन यांनाही निवेदन देण्यात आले.निवेदन देताना शिष्टमंडळात महेश मेंढे यांच्यासह चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूर पंचायत समिती माजी सभापती रोशन पचारे, घु्ग्घुस ग्रामपंचायत सदस्य पवन आगदारी, बबलू सातपुते, प्रेमानंद जोगी उपस्थित होते.