शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालय राजुरा क्षेत्रासाठी वरदान ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST

बाळू धानोरकर : १२ कोटी ६४ लाखांचे प्रशस्त रुग्णालय जनसेवेसाठी सज्ज राजुरा : आमदार सुभाष धोटे यांच्या परिश्रमाने ...

बाळू धानोरकर : १२ कोटी ६४ लाखांचे प्रशस्त रुग्णालय जनसेवेसाठी सज्ज

राजुरा : आमदार सुभाष धोटे यांच्या परिश्रमाने पूर्णत्वास आलेल्या १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय राजुराचे लोकार्पण आ. धोटे यांच्या हस्ते आणि खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना खा. धानोरकर म्हणाले, आ. सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या परिश्रमाने सुसज्ज असे राजुरा उपजिल्हा रुग्णालय जनसेवेसाठी सज्ज झाले आहे. हे रुग्णालय राजुरा क्षेत्राच्या नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.

उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी १९ डिसेंबर २०१० रोजी राजुरा येथील कार्यक्रमात श्रेणीवर्धीत १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची घोषणा केली होती. त्या घोषणेच फलित आज राजुरा तालुक्यातील नागरिकांना प्रत्यक्ष पहावयास मिळत आहे. निश्चितपणे हे रुग्णालय क्षेत्रातील जनतेच्या सेवेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, नगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा चिकित्सक निवृत्ती राठोड, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, मुख्याधिकारी आर्शिया जुही, जेष्ठ नेते हमीदभाई, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरनुले, साईनाथ बतकमवार, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदु वाढई, राजुरा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष एजाज अहमद, ॲड. सदानंद लांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे आणि अभियंता ए.ए. बाजारे, शाखा अभियंता वैभव जोशी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिक्षक डॉ. लहू कुलमेथे यांनी केले. संचालन प्रयोगशाळा तंत्रज्ञ चंद्रकांत नेवलकर यांनी केले.