शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्टंटबाजी युवकाच्या जीवावर बेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:45 IST

दुचाकी वाहनाने ट्रिपल सीट स्टंटबाजी करणे एका युवकाच्या जिवावर बेतले. एक युवक जखमीही झाला. सुदैवाने तिसरा युवक बचावला. मात्र या स्टंटबाजीमुळे मागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात होऊन तोदेखील जखमी झाला. दोन्ही गंभीर युवकावर चंद्रपूरच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रविवारी रात्री ११.३० वाजता येथील भवानी माता मंदिरासमोर घडली.

ठळक मुद्देएकाचा जागीच मृत्यू : दोन जण गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : दुचाकी वाहनाने ट्रिपल सीट स्टंटबाजी करणे एका युवकाच्या जिवावर बेतले. एक युवक जखमीही झाला. सुदैवाने तिसरा युवक बचावला. मात्र या स्टंटबाजीमुळे मागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात होऊन तोदेखील जखमी झाला. दोन्ही गंभीर युवकावर चंद्रपूरच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रविवारी रात्री ११.३० वाजता येथील भवानी माता मंदिरासमोर घडली.सुहास दादा आमटे (१९) असे मृतकाचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हे युवक सहभागी झाले होते. जुन्या बसस्थानकावरील डॉ. आंबेडकर चौकात महाप्रसाद सेवन करून शिवाजी नगर येथील आपल्या दुचाकीने (क्रमांक एम.एच. ३४ एबी ००४५) सुहास दादा आमटे (१९), रक्षित प्रबुध्द पाझारे (१९) व अन्य १ असे तिघे जण रस्त्याने स्टंटबाजी करीत जात असताना अचानक रस्ता दुभाजकाला त्यांची दुचाकी आदळली. त्यात सुहास आमटे याचा जागीच मृत्यू झाला. तर रक्षीत जखमी झाला. आणि एकाला किरकोळ मार लागला. त्याचवेळी मागून आलेली दुसरी दुचाकी त्यांच्या दुचाकीला आदळली. यात दुसºया दुचाकीवरील नेहाल अशोक भागवत (२२) रा. शिवाजी नगर हा गंभीर जखमी झाला. दोन्ही जखमींना उपचारार्थ चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार हृदयनारायण यादव यांच्या मागदर्शनात सुरू आहे.युवकाचा अपघाती मृत्यूआपल्या दुचाकीने वणी येथे गेलेल्या येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील सचिन शंकर लभाने (३२) याचा अपघाती मृत्यू झाला. सचिन लभाने हा वणी येथील आपले काम आटोपून आपल्या दुचाकीने भद्रावतीकडे येत असताना अपघात झाला. त्यात तो दगावला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.