शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राजुऱ्यात साकारणार दोन कोटींची अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:19 IST

क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारात ग्रामीण व छोट्या शहरातील खेळाडू राज्य तथा आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल करीत आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : जिल्ह्यातील क्रीडापटूंना सर्व सुविधा व संसाधन उपलब्ध होणार

आॅनलाईन लोकमतराजुरा : क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारात ग्रामीण व छोट्या शहरातील खेळाडू राज्य तथा आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल करीत आहे. मर्यादित सुविधा असतानाही हे खेळाडू आपल्या खेळात अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघर्ष करीत आहे. या खेळाडूंना त्याच्या गावातच आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास हे खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करू शकतात. या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे. याकरिता सर्व तालुकास्तरावर अत्याधुनिक क्रीडा संकुलचे निर्माण केले जात आहे, असे प्रतिपादन अर्थ, नियोजन तथा वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी येथे आयोजित जिल्हास्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्ध्येच्या उद्घाटनप्रसंगी केले.चंद्रपुर जिल्ह्यातील अनेक खेळाडू आपल्या खेळात प्रवीण आहे. या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करीत आहो व त्याकरिता आपण कटिबंध अहो, असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी राजुरा येथे सरदार पटेलांच्या स्मृतीत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका निर्माण करण्याकरिता २ कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणा केली. आ. अ‍ॅड संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील समस्यांकडे ना. मुनगंटीवारांचे लक्ष वेधले. चंद्रपूर आ. नाना शामकुळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. मंचावर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरिश शर्मा, जि. प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, गोंडपिपरी पं. स. सभापती दीपक सातपुते, गोंडपिपरी नगराध्यक्ष संजय झाडे, उपनगराध्यक्ष चेतन गौर, सतीश धोटे, महेश देवकते, विनायक देशमुख, सिद्धार्थ पथाडे, स्वामी येरोलवार, अ‍ॅड अरुण धोटे, केशवराव गिरमाजी, बबन निकोडे, जि. प. सदस्य सुनील उरकुडे, सर्व पं.स., पालिका, नगर पंचायत, सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी विश्रामगृहापासून तिरंगा यात्रा काढण्यात आली. संचालन आशिष ताजने, निलेश गिरडकर, तर आभार प्रदर्शन सतीश धोटे ह्यांनी केले.