शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

मुलींसाठी अभ्यासिका सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:22 IST

कुशाग्र बुद्धिमत्ता, सहनशीलता, एकाग्रता ही नैसर्गिक देणगी मुलींना मिळाली आहे. मुलींनी संशोधन व नावीन्यपूर्ण प्रयोगामध्ये स्वत:ला झोकून द्यावे. गुणवत्तेचा उपयोग समाजाच्या भल्याकरिता करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढे यावे, या हेतूने मुलींसाठी जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर अभ्यासिका सुरू करणार, अशी घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केली. एफईएस गर्ल्स कॉलेजच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी केली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मिशन सेवामध्ये मुलींनो सहभागी व्हा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुशाग्र बुद्धिमत्ता, सहनशीलता, एकाग्रता ही नैसर्गिक देणगी मुलींना मिळाली आहे. मुलींनी संशोधन व नावीन्यपूर्ण प्रयोगामध्ये स्वत:ला झोकून द्यावे. गुणवत्तेचा उपयोग समाजाच्या भल्याकरिता करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढे यावे, या हेतूने मुलींसाठी जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर अभ्यासिका सुरू करणार, अशी घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केली. एफईएस गर्ल्स कॉलेजच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी केली.मंचावर फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय मोगरे, संस्थेचे सचिव अ‍ॅड. पुरूषोत्तम सातपुते, प्राचार्य डॉ. सरोज झंझाळ, सुमन उमाटे, प्रभाकर बनकर, देवानंद खोब्रागडे, राहुल बनकर, इको -प्रोचे बंडू धोत्रे उपस्थित होते.ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सर्व क्षेत्रात मुलींच्या गुणवत्तेचा आज दबदबा निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजाचे नेतृत्व करण्यासाठी आता मुलींनी पुढे यावे. चंद्रपूरमध्ये सुरू करण्यात आलेल्या मिशन सेवा या अभियानात सहभागी व्हावे. मिशन शौर्यच्या माध्यमातून ५ आदिवासी मुलांनी एव्हरेस्ट सर करून चंद्रपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रामध्ये क्रांती घडावी, असा प्रयत्न आहे. विद्यार्थिनीने आॅलम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करावे. मनात हजारदा यशाचा विचार करा, यश तुम्हाला निश्चित मिळेल, असा मंत्रही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितला. यावेळी मेघा डुकरे, रूक्षाली दुबे, रूपाली कटकमवार, सीमा कोवे, रिमा कुशवाह, पायल ब्रह्मया, स्वाती संतपुरीवार, पुष्पा बावणे, सोनी सेगम आदी विद्यार्थिंनीचा पालकमंत्र्यांच्या सत्कार करण्यात आला.बल्लारपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकूल२०२४ मध्ये होणाऱ्या आॅलम्पिकमध्ये जिल्ह्यातील मुलांनी भारतासाठी पदक मिळवावे, यासाठी बल्लारपूरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारले जात आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा स्टेडियमसह ज्युबिली हायस्कूलच्या मागे २५ कोटींचे शहीद बाबुराव शेडमाके क्रीडा संकुल उभारल्या जात आहे.स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढणारजिल्ह्यातील मुलांचा सरकारी नोकरीमध्ये टक्का वाढावा, यासाठी मिशन सेवा सुरू आहे. यातून जिल्ह्यातील मुला- मुलींनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अन्य पदांवर पोहचावे, अशी अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.